IPL 2020: शुभमन गिल ते संजू सॅमसन; इंडियन प्रीमियर लीग 13 मध्ये 'हे' 5 युवा फलंदाज UAEमध्ये गाजवत आहे मैदान
आयपीएल 2020मध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांतील ठळक वैशिष्ट्य म्हणजे युवा भारतीय फलंदाजांची कामगिरी ज्यांनी जागतिक क्रिकेटमधील काही उत्कृष्ट गोलंदाजांविरूद्ध मोठ्या मंचावर स्वत:च्या आगमनाची घोषणा केली. इंडियन प्रीमियर लीगमधील मोठ्या टप्प्यात खेळताना शुभमन गिल, संजू सॅमसन, ईशान किशन, राहुल तेवतिया आणि देवदत्त पड्डीकल यांनी आपले फलंदाजीतील कौशल्याने अनेकांना प्रभावित केले.
इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 13व्या सत्राचा थरार संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) येथे सुरु झाला आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या आयपीएल (IPL) 2020 सामन्यांतील एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे युवा भारतीय फलंदाजांची कामगिरी ज्यांनी जागतिक क्रिकेटमधील काही उत्कृष्ट गोलंदाजांविरूद्ध मोठ्या मंचावर स्वत:च्या आगमनाची घोषणा केली. युएईमध्ये होणार्या इंडियन प्रीमियर लीगमधील मोठ्या टप्प्यात खेळताना शुभमन गिल (Shubman Gill), संजू सॅमसन (Sanju Samson), ईशान किशन, राहुल तेवतिया (Rahul Tewatia) आणि देवदत्त पड्डीकल यांनी आपले फलंदाजीतील कौशल्य आणि दडपण हाताळण्याची क्षमता या दोन्ही गोष्टीत अनेकांना प्रभावित केले. राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा 25-वर्षीय संजू सॅमसन सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वातील राजस्थानकडून खेळलेल्या तीन सामन्यांत त्याने 167 धावा केल्या. त्याने दोन अर्धशतकांसह 200 च्या शानदार स्ट्राइक रेटने या धावा केल्या आहेत. (IPL 2020: CSKचा वेगवान गोलंदाज केएम आसिफने केलं बायो बबल प्रोटोकॉलच उल्लंघन? पाहा काय म्हणाले संघाचे CEO कासी विश्वनाथन)
या आयपीएलमध्ये आतापर्यंत प्रसिद्धी मिळवणारा राजस्थानचा आणखी एक फलंदाज म्हणजे राहुल तेवतिया. रॉयल्सकडून तीन सामन्यांत त्याने 77 धावा केल्या आहेत, तर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध सामन्यात 53 धावांच्या डावांच्या खेळीत त्याने शेल्डन कोटरेलच्या 5 षटकारांमुळे तो एक रात्री स्टार बनला आणि या मोसमात चर्चेचा विषय ठरला. गतविजेत्या मुंबई इंडियन्सलाही ईशान किशनमध्ये स्टार खेळाडू सापडला आहे. किशनने 99 धावा केल्या आणि मुंबई इंडियन्सकडून दोन डावात 127 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट 140 हून अधिक प्रभावी आहे आणि रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघासाठी आगामी सामन्यांमध्ये त्याने मोठी भूमिका निभावण्याची अपेक्षा आहे.
यंदाच्या आयपीएल आवृत्तीत प्रसिद्धी मिळवणारा आणखी एक तरुण म्हणजे 20-वर्षीय देवदत्त पड्डीकल. आयपीएलमध्ये यंदा पदार्पण करणारा देवदत्त सध्या आरसीबीसाठी सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. चॅलेंजर्सकडून देवदत्तने तीन सामन्यांत 111 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्ससाठी इयन मॉर्गन आणि आंद्रे रसेलसह गिल महत्त्वाच्या फलंदाजांपैकी एक मानला जातो. शुभमनने फलंदाजी केलेल्या तीन डावांमध्ये 124 धावा केल्या आहेत. या व्यतिरिक्त रियान पराग आणि पृथ्वी शॉ सारखे अन्य युवा भारतीय फलंदाजांनी अद्याप आयपीएल रंगमंचावर प्रभावी डाव खेळला नाही, जे क्रिकेटमधील अनेक लोक पाहण्यास उत्सुक असतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)