IPL 2020: DC विरुद्ध रोहित शर्मा 'गोल्डन डक'वर बाद; मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने केली हरभजन सिंह, पार्थिव पटेलच्या 'नकोशा' रेकॉर्डची बरोबरी

आणि यासह त्याने चेन्नई सुपर किंग्सच्या हरभजन सिंह आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या पार्थिव पटेलच्या नकोशा विक्रमाशी बरोबरी केली. पार्थिव आणि भज्जी हे इतर फलंदाज आहे जे आयपीएलमध्ये 13 वेळा 'डक'चा शिकार ठरले आहेत.

रोहित शर्मा (Photo Credit: Instagram)

Most Ducks in IPL: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किंवा युएईमध्ये सध्या सुरू असलेल्या आयपीएल (IPL) 2020 मध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे मुंबईसाठी चार सामन्यांना मुकलेल्या रोहितने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामन्यातून आयपीएलमध्ये पुनरागमन केले. पण दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर (IPL Qualifier 1) सामन्यात 'हिटमॅन' पुन्हा एकदा मोठा डाव खेळण्यात अपयशी ठरला. रोहितला रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि शून्यावर माघारी धाडले. रोहित आयपीएलच्या इतिहासात 13व्यांदा भोपळाही न फोडता माघारी परतला आहे. आणि यासह त्याने चेन्नई सुपर किंग्सच्या हरभजन सिंह आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या पार्थिव पटेलच्या नकोशा विक्रमाशी बरोबरी केली. (MI vs DC, IPL 2020 Qualifier 1: सूर्यकुमार यादव, ईशान किशनचे दमदार अर्धशतक; हार्दिक पांड्याने धुतलं, दिल्ली कॅपिटल्सला 201 धावांचे आव्हान)

पार्थिव आणि भज्जी हे इतर फलंदाज आहे जे आयपीएलमध्ये 13 वेळा 'डक'चा शिकार ठरले आहेत. यंदा आयपीएलमध्ये रोहितचा फॉर्म काही खास राहिला नाही. शिवाय, यापृवी देखील रोहित आयपीएल प्ले ऑफ, सेमीफायनल, फायनल आणि नॉकआउट सामन्यात चांगली कामगिरी करू शकला नाही. आयपीएलच्या सेमीफायनल / फायनल / प्लेऑफमध्ये हिट मॅनमध्ये आतापर्यंत त्याने 19 डावात फक्त 229 धावा केल्या आहेत, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. इतकंच नाही तर आयपीएलच्या या महत्त्वपूर्ण सामन्यात रोहित 3 वेळा'गोल्डन डक'वर बाद झाला आहे. दुसरीकडे, आजच्या सामन्यात रोहितला मुंबई इंडियन्ससाठी 4000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी 8 धावांची गरज असतानाआयपीएलच्या 199व्या सामन्यात रोहित शून्यावर बाद झाला.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस गमावून 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 200 धावांपर्यंत मजल मारली. मुंबईसाठी सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी अर्धशतकी डाव सूर्यकुमारने 51 तर ईशान किशन नाबाद 55 धावा करून परतला. क्विंटन डी कॉकने 40 आणि हार्दिक पांड्याने नाबाद 37 धावांचे योगदान दिले. दिल्लीसाठी रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर मार्कस स्टोइनिस आणि एनरिच नॉर्टजे यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.



संबंधित बातम्या

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद

NZ Beat ENG 3rd Test 2024 Scorecard: तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडचा 423 धावांनी केला पराभव, मिशेल सँटनर ठरला विजयाचा हिरो; टीम साऊदीला मिळाल शानदार निरोप