IPL 2020: RCB कर्णधार विराट कोहलीने सामन्यासह जिंकली नेटकऱ्यांची मनं, RRच्या राहुल तेवतियाला दिली 'रॉयल' भेट, पाहा Photo
आजच्या सामन्यात विराटने आपल्या बॅटने मोठा डाव खेळलाच पण सामन्यानंतरच्या एका कृतीने त्याने यूजर्सची मनंही जिंकली.सामन्यानंतर राहुल तेवतियाला विराटने आपली ऑटोग्राफी वाली जर्सी तेवतियाला भेट दिली.
आयपीएल 2020 मधील किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध सामन्यात कॅरेबियन वेगवान गोलंदाज शेल्डन कॉटरेलच्या एका ओव्हरमध्ये पाच षटकार ठोकणारा राहुल तेवतिया भारतभरात प्रसिद्ध झाला. त्या स्फोटक डावाच्या जोरावर तेवतियाने राजस्थान रॉयल्सला पराभवाच्या तोंडून बाहेर काढत विजयाकडे नेले. आयपीएलच्या इतिहासातील धावांचा पाठलाग करून शारजाहमधील राजस्थानचा विजय हा सर्वात मोठा विजय ठरला. शनिवारी राजस्थानच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध सामन्यात तेवतियाने 12 चेंडूत 24 धावांची खेळी केली आणि यात त्याने तीन षटकार ठोकले. तेवतियाच्या या खेळीमुळे राजस्थानने आरसीबीसमोर विजयासाठी 155 धावांचे लक्ष्य दिले. पण विराट कोहली आणि देवदत्त पड्डीकलच्या अर्धशतकी डावामुळे राजस्थानला पराभव पत्करावा लागला. आजच्या सामन्यात विराटने आपल्या बॅटने मोठा डाव खेळलाच पण सामन्यानंतरच्या एका कृतीने त्याने यूजर्सची मनंही जिंकली.
सामन्यानंतर तेवतियाला आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीची एक अविस्मरणीय भेट मिळाली जी तो आपल्याबरोबर आयुष्यभर ठेवू इच्छित असेल. सामन्यानंतर विराटने आपली ऑटोग्राफी वाली जर्सी तेवतियाला भेट दिली. अगदी काही मिनिटांतच विराट आणि तेवतियाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि यूजर्सने तोंडभरून विराटचे कौतुक केले.
पाहा यूजर्सच्या प्रतिक्रिया:
तेवतियाचे करिअर
गोड जेस्चर
फॅन मुमेंट
अत्यंत सुंदर
राजा
दोन्ही टीममधील आजच्या सामन्याबद्दल बोलायचे तर रॉयल्सने पहिले फलंदाजी करून आरसीबीला दिलेल्या 155 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत रॉयल चॅलेंजर्सने 8 विकेट आणि 5 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. यात देवदत्त पड्डीकलने दुसरे आयपीएल शतक ठोकले आणि 63 धावा केल्या. कर्णधार विराट 72 धावांवर नाबाद परतला. दरम्यान, विराटचे यंदाच्या आयपीएलमधील आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली.देवदत्त आणि विराटमध्ये 99 धावांची भागीदारी झाली. यादरम्यान, विराट ने 41 चेंडूत यंदाच्या आयपीएलमध्ये पहिले अर्धशतक पूर्ण केले.