IPL Auction 2025 Live

IPL 2020 PlayOffs Match: आयपीएल 2020 प्ले-ऑफमध्ये कोणाता संघ कोणाशी भिडणार? येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

या हंगामात मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाने दमदार कामगिरी करत प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले आहे.

IPL Trophy | Representative Image | (Photo Credits: File Image)

Indian Premier League 2020:  इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम रोमांचकारी ठरला आहे. या हंगामात मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाने दमदार कामगिरी करत प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले आहे. तर, चौथ्या स्थानासाठी कोलकाता नाईट राईडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रस्सीखेच सुरु होती. पंरतु, या हंगामातील शेवटच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध विजय मिळवत सनरायझर्स हैदराबाद प्ले- ऑफमध्ये धडक दिली आहे. यामुळे या प्ले-ऑफमध्ये कोणता संघ कोणाशी लढणार? याची सर्वांनाच उस्तुकता आहे. तर, जाणून घेऊया प्ले-ऑफमधील होणाऱ्या संपूर्ण सामन्याचे वेळापत्रक.

आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचा संघ 18 गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या क्रमाकांवर असून त्यांना 16 गुण आहेत. तर, सनरायजर्स हैदराबादच्या (+0.608) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (- 0.172) आणि कोलकाता नाईट राईडर्स (-0.214) संघाचे प्रत्येकी 14 गुण आहेत. सरासरीच्या तुलनेत हैदराबाद आणि बेंगलोरचे कोलकाताच्या संघापेक्षा अधिक वजन आहे. ज्यामुळे हैदराबाद आणि बेंगलोरचा संघाने प्ले-ऑफमध्ये जागा मिळवली आहे. तर, कोलकाताचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हे देखील वाचा- IPL 2020: सनरायजर्स हैदराबादचा संदीप शर्मा याने झहीर खान याला टाकले मागे; पॉवर-प्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा रचला विक्रम

 सेमिफायनल 1-

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स पहिल्या सेमिफायनलमध्ये एकमेकांशी लढणार आहे. 5 नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात जो जिंकेल, त्या संघाला अंतिम सामन्यात प्रवेश मिळणार आहे.

एलिमिनेटर-

सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात 6 नोव्हेंबर रोजी पहिला एलिमिनेटर सामना खेळण्यात येणार आहे. शेख जायद स्टेडिअमवर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय झालेल्या संघ पहिल्या सेमिफायनलमध्ये पराभूत झालेल्या संघाशी भिडणार आहे.

सेमिफायनल 2

पहिल्या सेमिफायनल पराभूत झालेला संघ आणि एलिमिनेटर 1 मध्ये विजय झालेल्या संघात 8 नोव्हेंबर रोजी शेख जायद स्टेडिअमवर दुसरी सेमिफायनल खेळली जाणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ आयपीएल 2020 किताबावर नाव कोरणार आहे.