IPL Auction 2025 Live

IPL 2020: हार्दिक आणि क्रुणाल यांच्यात कोण आहे 'स्मार्ट पांड्या'? मुंबई इंडियन्स अष्टपैलू किरोन पोलार्डने केला खुलासा, पाहा Video

दरम्यान, मुंबई इंडियन्सचे उपकर्णधार किरोन पोलार्डने सांगितले की या दोन क्रिकेटपटूंमधील सर्वात हुशार कोण आहे. मुंबई इंडियन्सने नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यात पोलार्डने कृणालचे ‘स्मार्ट पांड्या’ असे वर्णनही केले.

हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या (Photo Credit: Instagram)

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) आयपीएल (IPL) फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) महत्त्वाचे भाग आहेत. दोन्ही क्रिकेटपटू गेली अनेक वर्षे मुंबई इंडियन्सकडून शानदार प्रदर्शन करत आले आहेत. दोघा खेळाडूंना स्मार्ट क्रिकेटपटू मानले जातात. तथापि, दरम्यानच्या काळात, मुंबई इंडियन्सचे उपकर्णधार किरोन पोलार्डने (Kieron Pollard) सांगितले की या दोन क्रिकेटपटूंमधील सर्वात हुशार कोण आहे. मुंबई इंडियन्सने नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात पोलार्ड पांड्या बंधूबरोबर त्याच्या संबंधांविषयी बोलताना दिसला. पोलार्ड म्हणाला की या तिघांमधील मैत्री जितकी मैदानाबाहेर आहे तितकी मैदानावर कायम आहे. हार्दिक, क्रुणाल आणि पोलार्ड हे एमआय (MI) संघातील तीन सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत आणि यंदाच्या आयपीएल फायनलमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील अशी अपेक्षा आहे. या दरम्यान, पोलार्डने कृणालचे ‘स्मार्ट पांड्या’ असे वर्णनही केले. (IPL 2020 Most Sixes and Fours: मुंबई इंडियन्सचे ईशान किशन-सूर्यकुमार यादव षटकार-चौकारांचे बादशाह, 'हे' दोन फलंदाज देत आहे 'SKY'ला टक्कर)

“मी नेहमी म्हणतो की तिथे हार्दिक पांड्या आहे आणि नंतर तेथे हुशार पांड्या (क्रुणाल) आहेत. आमच्या मैदानाबाहेरचे संबंध क्रिकेट मैदानावर दिसतात,” मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पोलार्डने म्हटले. तो म्हणाला की, “आम्ही अशाच प्रकारच्या काही भावना शेअर करतो, आम्ही फक्त मदत करू इच्छितो अशा प्रकारच्या लोकांपैकी आहोत आणि फक्त त्या क्षणाचा आनंद घेत आहोत आणि आम्हाला जी काही संधी दिली आहे त्याबद्दल आभारी व कृतज्ञ आहोत,” त्याने पुढे म्हटले. पोलार्डने पुढे हार्दिकच्या मैदानावरील आणि मैदानाबाहेरील आत्मविश्वासाबद्दल त्यांचे कौतुक केले. “ते चांगल्या लोकांसारखे आहेत. आणि या व्यक्ती पसंत न करणे खूप अवघड आहे.”

मुंबई इंडियन्स संघ ज्या फॉर्ममध्ये खेळत आहे तो पाहता ते या स्पर्धेचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. अंतिम सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ संतुलित दिसत आहे अशा स्थितीत पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनण्याची मुंबईकडे यंदा सुवर्ण संधी आहे. आजच्या एलिमिनेटर असमन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना दिल्ली कॅपिटलशी होईल आणि स्पर्धेचा विजेता अंतिम फेरीत मुंबईचा सामना करेल.