IPL 2020 Auction: फॅनने आयपीएल लिलावाबद्दल विचारलेल्या 'या' प्रश्नावर जिमी नीशम याने दिली 'ही' प्रतिक्रिया, वाचून तुम्हीही सहमत व्हाल, पाहा Tweet 

आयपीएलच्या बहुप्रतिक्षित लिलावापूर्वी एका चाहत्याने न्यूझीलंडचा अष्टपैलू जिमी निशमला असे सुचवले की आयपीएलचे माजी चॅम्पियन सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) त्याच्यासाठी लिलावात बोली लावू शकतात. 'आयपीएलचा लिलाव अप्रत्याशित आहे', असल्याचे मत नीशमने व्यक्त केले पण त्यानंतर एका चाहत्याने त्याच्यासाठी एक सल्ला दिला.

जिमी नीशम (Photo Credit: Getty Images)

2020 च्या आयपीएलसाठी (IPL) खेळाडूंचे लिलाव येत्या 19 डिसेंबरला कोलकातामध्ये होणार आहे. क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध खेळाडूंपासून नवीन चेहऱ्यांपर्यंत सर्व खेळाडूंचा लिलाव केला जाणार आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू जिमी निशम (Jimmy Neesham) याची त्याच्या अष्टपैलू कर्तृत्वासाठीच नव्हे तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील त्याच्या विनोदी, अनोख्या प्रतिक्रिया किंवा पोस्टसाठीही ख्याती आहे. वेळोवेळी तो आपल्या बुद्धीने आणि विनोदाने प्रत्येकाचे मनोरंजन केले आहे. आयपीएलच्या बहुप्रतिक्षित लिलावापूर्वी एका चाहत्याने या किवी अष्टपैलूला असे सुचवले की आयपीएलचे माजी चॅम्पियन सनरायझर्स हैदराबाद (SRH) त्याच्यासाठी लिलावात बोली लावू शकतात. ट्विटरवर चाहत्यांसमवेत प्रश्न / उत्तर सत्रात नीशमला आगामी पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये भाग घेऊ शकणार नाही, असे विचारले गेले. राष्ट्रीय वचनबद्धतेमुळे असे होणार नाही नसल्याचे 29 वर्षीय क्रिकेटपटूंने सांगितले आणि त्यानंतर ते संभाषण लवकरच आयपीएलकडे वळले. (IPL 2020 Auction: 971 खेळाडूंचा होणार लिलाव; मिशेल स्टार्क आणि जो रूट यांनी घेतली माघार, अनेक खेळाडूंची बेस प्राईज जाहीर, घ्या जाणून)

'आयपीएलचा लिलाव अप्रत्याशित आहे', असल्याचे मत नीशमने व्यक्त केले पण त्यानंतरच एका चाहत्याने त्याच्यासाठी एक सल्ला दिला. आयपीएलच्या लिलावाने अनेकदा आश्चर्यांची नोंद केली आहे. सौरव गांगुली आणि क्रिस गेल यांसारखे दिग्गजही अनसोल्ड राहिले आहेत, त्यामुळे आयपीएलच्या लिलावाबद्दल खरोखर काहीच सांगता येत नाही, असे मानणे सुरक्षित आहे. पाहा संपूर्ण संभाषण कसे घडले ते:

लिलाव अप्रत्याशित आहे. कोणाला माहित आहे

केन हैदराबादचा कर्णधार आहे. आणि त्यांच्याकडे मध्यम फळीचा डावखुरा फलंदाज नाही जो षटकार मारू शकेल. तर,...

यूजरच्या या प्रतिक्रियेवर जिमीने जीआयएफ ट्विट केले.

दरम्यान, 2014 मध्ये नीशम दिल्ली कॅपिटल्ससाठी आयपीएलचा फक्त एक हंगाम खेळला होता. त्याने खेळलेल्या चार सामन्यात त्याने 42 धावा केल्या आणि एक विकेटही घेतली. दुखापतीमुळे केकेआरसह त्याचा 2015 चा कार्यकाळात अडथळे निर्माण झाले. 19 डिसेंबर रोजी आयपीएलच्या सर्व आठ फ्रेंचायझी 2020 च्या लिलावासाठी कोलकातामध्ये असतील. चेन्नई सुपर किंग्जसारखे संघ केवळ आपली बाजू निश्चित करू पाहतील तर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसारखे संघ मोठ्या प्रमाणात खरेदी करून आपली बाजू पुन्हा मजबूत करू पाहतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now