IPL 2020 Auction: जयदेव उनाडकट याने आयपीएल लिलावात नोंदवला नवीन रेकॉर्ड, राजस्थान रॉयल्स ने 3 कोटींमध्ये केले खरेदी
भारताच्या या वेगवान गोलंदाजाला राजस्थान रॉयल्सने यंदा 3 कोटींच्या रकमेत संघात सामिल केले. लिलावाच्या इतिहासातील सर्वात जास्त मागणी असणारा खेळाडू म्हणून उनाडकाटला फ्रँचायझीने 9 व्या वेळी खरेदी केले.
जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) यावर्षीच्या आयपीएलच्या (IPL) लिलावात जास्त पैसे कमवू शकले नाहीत. भारताच्या या वेगवान गोलंदाजाला राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) यंदा संघात समावेश केला. राजस्थानने उनाडकटला 3 कोटींच्या रकमेत संघात सामिल केले. राजस्थान संघाने उनाडकटला सलग तिसऱ्यांदा खरेदी केले. 2018 च्या लिलावात राजस्थानने उनादकटला प्रथम 11.50 कोटींमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले होती. त्यानंतर त्यांनी 2019 मध्ये हे 8.40 कोटी रुपयांत विकत घेतले. पण, नंतर त्यांनी त्याला रिलीज केले आणि आता त्यांनी पुन्हा एकदा त्याला संघात सामिल केले. या लिलावात विक्री करुन उनादकटने आयपीएलमध्ये विक्रम नोंदविला असून हा लिलावात सर्वाधिक वेळा विकल्या जाण्याचा आहे. 2011 पासून उनाडकट प्रत्येक आयपीएलच्या लिलावात विकला गेला आहे. 2011 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने उनाडकाटला त्यांच्या संघात 1.15 कोटी रुपयात समाविष्ट केले होते. यानंतर कोलकाताने 2012 मध्ये त्याच किमतीत खरेदी केले. (IPL 2020: कोट्याधीश यशस्वी जयस्वाल याच्या 'प्रेरणादायक' प्रवासाची प्रीती झिंटा कडून प्रशंसा, म्हणाली 'आयपीएल हे स्वप्नपूर्तीचे व्यासपीठ')
2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला 2.41 कोटींमध्ये त्याच्या संघात स्थान दिले. 2014 आणि 2015 मध्ये दिल्ली कॅपिटल्स, 2016 मध्ये कोलकाता संघाने त्याच्यासाठी पसंती दर्शवली. 2017मध्ये राइजिंग पुणे सुपरगिजंट्स आणि 2018 मध्ये तो राजस्थानशी जुडला आणि राजस्थान दरवर्षी कमी पैशात ते विकत घेत आहे. दरम्यान, यंदाच्या लिलावात उनाडकटला खरेदी करण्यासाठी राजस्थानला दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबचे आव्हान समोर आले. यंदा लिलावाच्या इतिहासातील सर्वात जास्त मागणी असणारा खेळाडू म्हणून उनाडकाटला फ्रँचायझीने 9 व्या वेळी खरेदी केले. उनादकट आतापर्यंत आयपीएलमध्ये 5 संघांसाठी खेळला आहे. त्याने 73 सामने खेळले आहेत आणि 28.46 च्या सरासरीने दोनद पाच विकेट्ससह 77 विकेट्स मिळवले आहेत.
इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या आवृत्तीपूर्वी राजस्थानने 11 खेलाडू रिटेन केले आणि 11 खेळाडूंना रिलीज केले होते. 2020 हंगामात पुन्हा एकदा स्टीव्ह स्मिथ त्यांचे नेतृत्व करेल. उनाडकटव्यतिरिक्त राजस्थानने लिलावात रॉबिन उथप्पा, अँड्र्यू टाय आणि ओशाने थॉमस याना कोटींची बोली लावून खरेदी केले.