Mumbai Indians IPL 2020 Road to Final: मुंबई इंडियन्स सहाव्यांदा आयपीएल फायनलमध्ये, जाणून घ्या सीजन 13 मध्ये कसा होता चॅम्पियन संघाचा प्रवास

या हंगामात मुंबई संघ चॅम्पियनप्रमाणे खेळला आहे. यंदा आपले पाचवे विजेतेपदाच्या निर्धारित असणाऱ्या मुंबईचा आज आपण जाणून घेणार दुबई येथे झालेल्या 13व्या हंगामातील फायनल पर्यंतचा प्रवास.

मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

IPL 2020 Road to Final: गतविजेत्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएलच्या दुसर्‍या फायनलमध्ये (IPL Final) स्थान मिळवले आणि आतापर्यंत पाचवे जेतेपद जिंकण्याच्या मार्गावर आहेत. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखालील एमआयचा (MI) सामना दिल्ली कॅपिटल्सशी (Delhi Capitals) होईल, जे पहिल्यांदा फायनलमध्ये पोहचले आहेत. मुंबई संघ अनुभवी असल्याने ते विजेतेपदासाठीचे प्रबळ दवेदार आहेत. यंदा मुंबईने सातत्याने हंगाम गाठण्याचा पराक्रम केला आहे. या हंगामात मुंबई संघ चॅम्पियनप्रमाणे खेळला आहे. 14 पैकी 9 सामने जिंकून संघाने प्लेऑफमध्ये 18 गुणांसह पहिलं स्थान पटकावलं. पहिल्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 57 धावांनी जिंकत सहाव्यांदा फायनलमध्ये प्रवेश मिळवला.  यंदा आपले पाचवे विजेतेपदाच्या निर्धारित असणाऱ्या मुंबईचा आज आपण जाणून घेणार दुबई येथे झालेल्या 13व्या हंगामातील फायनल पर्यंतचा प्रवास. (IPL 2020 Most Sixes and Fours: मुंबई इंडियन्सचे ईशान किशन-सूर्यकुमार यादव षटकार-चौकारांचे बादशाह, 'हे' दोन फलंदाज देत आहे 'SKY'ला टक्कर)

सुरुवात: गतविजेत्या चॅम्पियन्सची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांना चेन्नईकडून स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात पाच विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता, पण कोलकाताविरुद्ध पुढील सामन्यात त्यांनी बाजी मारली. मुंबईने केकेआरचा 49 धावांनी पराभव केला, आणि त्यांचा हंगाम सुरू झाला आहे असे दिसत असताना पुढच्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून सुपर ओव्हर थ्रिलरमध्ये पराभव पत्करावा लागला. गतविजेत्या चॅम्पियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध पुढील सामन्यातून विजय पथावर परतले. सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल सारख्या संघांना त्यांनी पराभूत केले. त्या वेळी सलामीची जोडी अव्वल फॉर्ममध्ये होती आणि गोलंदाजही शानदार कामगिरी करत होते.

मिड-फेज: रिव्हर्स फिक्स्चरमध्ये पंजाबविरुद्ध त्यांच्या पुढील सामन्यात मुंबईला पुन्हा एकदा सुपर ओव्हर थ्रिलरमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आणि त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्यासारखे वाटले, परंतु चॅम्पियन्स संघाने 10-गडी राखून चेन्नईविरुद्ध दमदार विजय मिळवला. पण मुंबई प्ले ऑफच्या जवळ पोहचले आहे असे दिसत असताना त्यांना राजस्थान रॉयल्सने पुढच्या सामन्यात आठ गडी राखून पराभूत केले. मात्र, या पराभवाचा त्यांना फटका बसला नाही आणि त्यांनी पुढील सामन्यात आरसीबी आणि दिल्लीविरुद्ध विजय मिळवत प्ले ऑफ स्थान निश्चित केलं. त्यांच्या शेवटच्या ग्रुप स्टेज गेममध्ये, जो हैदराबादसाठी महत्वाचा होता त्यात मुंबईने अव्वल क्रिकेट खेळले नव्हते आणि एसआरएचने त्यांना मागे टाकले.

क्वालिफायर-1: मुंबईने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवल्याने त्यांचा पहिल्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सशी सामना झाला. या सामन्यात मुंबईने आपला सर्वश्रेष्ठ खेळ करत दिल्लीचा 58 धावांनी पराभव करत फायनल गाठले. या सामन्यात जसप्रीत बुमराहने चार विकेट घेत मुंबईच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. युवा इशान किशननेही 30 चेंडूत शानदार नाबाद 55 धावा फटकावल्या.