IPL 2020: टी-20 वर्ल्ड कप स्थगित झाल्यास होऊ शकते आयपीएलचे आयोजन, BCCI अधिकाऱ्याने दिली माहिती

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील जवळजवळ सर्व गोष्टी ठप्प झाल्या आहेत. जगातील क्रीडा स्पर्धा एकतर स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आता इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) 13 वे सत्र आयोजन करण्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या विंडोकडे पहात आहे.

IPL 2020: टी-20 वर्ल्ड कप स्थगित झाल्यास होऊ शकते आयपीएलचे आयोजन, BCCI अधिकाऱ्याने दिली माहिती
आयपीएल (Photo Credit: Getty Images)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जगभरातील जवळजवळ सर्व गोष्टी ठप्प झाल्या आहेत. जगातील क्रीडा स्पर्धा एकतर स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आता इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) 13 वे सत्र आयोजन करण्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या विंडोकडे पहात आहे. मात्र, आयसीसीने (ICC) ऑस्ट्रेलियामध्ये होणारे टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) पुढे ढकल्यास ते शक्य होऊ शकते. आयएएनएसशी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, "ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएलचे (IPL) आयोजन करण्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत, पण 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियामध्ये होणारा विश्व टी-20 पुढे ढकलला गेलं तरच हे शक्य होईल. 13 व्या आयपीएलची सुरुवात 29 मार्च रोजी होणार होती, मात्र कोरोना व्हायरसमुळे 15 एप्रिलपर्यंत स्पर्धा शतगीत करण्यात आली. (आयपीएल 2020 वर अद्याप कोणताही निर्णय नाही, कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान BCCI चं परिस्थितीवर लक्ष)

“सध्या सीमारेषेवर लॉकडाऊन आहे आणि ऑस्ट्रेलियाने सहा महिन्यांच्या लॉकडाउनची संभाव्यता असल्याचे म्हटले आहे. परिस्थितीत सुधारणा झाल्याने गोष्टी बदलू शकतात. कॉर्न व्हायरसचा प्रसार होण्याचा धोका लक्षात घेत इंग्लंडही त्याच पद्धतीचं अनुसरण करू शकतो. आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याच्या संदर्भात भारत सरकार काय निर्णय घेईल हे आम्हाला अद्याप समजले नाही. अशा परिस्थितीत ऑक्टोबर-नोव्हेंबर ही एकमेव विंडो सुरक्षित दिसते. पण पुन्हा, तेव्हा टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन होणार आहे." अधिकाऱ्याने पुढे म्हटले, “जर सध्याच्या परिस्थितीमुळे आयसीसीने पुढे जाऊन टी-20 विश्वचषक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला तर आपण ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या विंडोकडे पहिले जाऊ शकते. परंतु पुन्हा, त्यासाठी, कोरोनाचा प्रसार थांबविण्याची आवश्यकता आहे आणि गोष्टी मानवी नियंत्रणाखाली आल्या पाहिजेत. थोडक्यात, बरीच गणितं करावी लागतील."

दुसरीकडे, टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनही लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. सध्या कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाचा मोठा परिणाम ऑस्ट्रेलियामध्येच दिसून येत आहे. या कारणामुळे ऑस्ट्रेलियाने पुढील काही महिन्यांसाठी लॉकडाउनचा मोठा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जाणाऱ्या या टी-20 विश्वचषक विषयी कोणताही मोठा निर्णय मे महिन्यातच घेण्यात येईल पण आयसीसीवर सध्याची स्थिती पाहता स्पर्धा स्थगित करण्यासाठी दबाव आणला जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 31, 2020 02:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).