IPL 2019,KKR vs KXIP: किंग्ज इलेवन पंजाब नाणेफेक जिंकून गोलंदाजीसाठी मैदानात दाखल

त्यापैकी 43 सामने संघाने जिंकले आहेत. तर, 25 सामन्यांमध्ये पराभावाचा सामना करावा लागला आहे. दोन सामने रद्द करण्या आले होते. दुसऱ्या बाजूला किंग्ज इलेवन पंजाबने या मैदानावर 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात विजय तर उर्वरीत 7 सामन्यांमध्ये या संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे.

IPL 2019,KKR vs KXIP | (File Photo)

IPL 2019,KKR vs KXIP: इंडियन प्रिमियर लिग (Indian Premier League) अर्थातच IPL 2019 स्पर्धेच्या 12 व्या पर्वातील सहावा सामना आज सामना आज कोलकाता येथील इडन गार्डन्स (Eden Gardens, Kolkata) मैदानावर खेळला जात आहे. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याच्या नेतृत्वाखालील किंग्ज इलेवन पंजाब (Kings Eleven Punjab) हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. नाणेफेक झाली असून, नाणेफेक जिंकत किंग्ज इलेवन पंजाब या संघाने मैदानात गोलंदाजीसाठी उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

कोलकाता नाईटरायडर्स (Kolkata Knight Riders) आणि किंग्ज इलेवन पंजाब (Kings Eleven Punjab) यांच्यात हा सामना खेळला जाईल. या दोन्ही संघांचा या पर्वातील दुसरा सामना आहे. कोलकाता (Kolkata) आणि पंजाब (Punjab) दोन्ही संघ एकमेकांना तुल्यबळ आहेत. दोघांनीही या आधी आपापले पहिले सामने जिंकले आहेत. पंजबाने राजस्थान रॉयल्स आणि कोलकाताने गेल्या वर्षी अंतिम सामना खेळणाऱ्या सनराइजर्स हैदराबाद संघाला पराभूत करुन 2-2 अशा फरकाने जिंकला आहे. दरम्यान, नेट रनरेटच्या जोराव पंजाब आणि कोलकाता हे संघ चौथ्या क्रमांकावर आहेत. पंजाब संघाचा रनरेट +0.700 आणि कोलकाता संघाचा रनरेट +0. 255 आहे.

ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईटरायडर्स संघाने आतापर्यंत आयपीएलचे एकूण 70 सामने खेळले आहेत. त्यापैकी 43 सामने संघाने जिंकले आहेत. तर, 25 सामन्यांमध्ये पराभावाचा सामना करावा लागला आहे. दोन सामने रद्द करण्या आले होते. दुसऱ्या बाजूला किंग्ज इलेवन पंजाबने या मैदानावर 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात विजय तर उर्वरीत 7 सामन्यांमध्ये या संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे.

कोलकाता नाइटराइडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उथप्पा, क्रिस लिन, शुभमन गिल, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रॅथवेट, सुनील नरेन, पीयूष चावला, कुलदीप यादव, निखिल नाइक, जोए डेनली, श्रीकांत मुंडे, नितिश राणा, संदीप वारियर, प्रसिद्ध कृष्णा, लॉकी फर्ग्युसन, हैरी गर्ने, केसी करियप्पा, यारा पृथ्वीराज.

किंग्स इलेवन पंजाब : रविचंद्रन अश्विन (कर्णधार) सॅम कुरन, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, निकोलस पूरन (विकेटकीपर), मोएसेस हेनरिक्स, क्रिस गेल, केएल राहुल, मयंक अग्रवाल, करुण नायर, मनदीप सिंह, मुजीब उर रहमान, एंड्रयू टॉय, अंकित राजपूत, डेविल मिलर, सरफराज खान, हरप्रीत बरार, सिमरन सिंह, मुरुगन अश्विन, हार्डुस विलजोएन, अर्शदीप सिंह, दर्शन नलकांडे, अग्निवेश अयाची.