IPL 2019 Live Streaming: SRH vs RCB आणि CSK vs RR या दोन सामन्यांची आज मराठीत कॉमेंट्री कुठे पहाल?

आज आयपीएलमध्ये सुपारी चार वाजता हैदराबाद (SRH) विरुद्ध बेंगळुरू (RCB) आणि संध्याकाळी आठ वाजता चैन्नई (CSK) विरुद्ध राजस्थान (RR) हे संघ भिडणार आहेत.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: IANS)

VIVO IPL 12: यंदा आयपीएलचा बारावा सीझन आठवडाभरापूर्वी सुरु झाला आहे. हळूहळू हा खेळ रंगायला सुरुवात झाली आहे. पण तुम्हांला आयपीएलच्या खेळाची तुमच्या भाषेत मज्जा घ्यायची असेल तर दर रविवारी मराठी क्रिकेट चाहत्यांसाठी आयपीएलच्या सामान्यांचे प्रक्षेपण 'स्टार प्रवाह'(Star Pravah) वर दाखवले जात आहेत. सोबतच मराठी भाषेत या खेळाची कॉमेंट्री दिली जात आहे. भारतासह जगभरात कोणत्या TV चॅनल्सवर पाहाल IPL सामने? घ्या जाणून

IPL 12 आजचे सामने 

आज आयपीएलमध्ये सुपारी चार वाजता हैदराबाद (SRH)  विरुद्ध बेंगळुरू (RCB) आणि संध्याकाळी आठ वाजता चैन्नई (CSK) विरुद्ध राजस्थान (RR)  हे संघ भिडणार आहेत. या सामन्याचं ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार वर दाखवले जाईल. ऑनलाईन सामना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठीत कॉमेंट्री कुठे पहाल? 

 

स्टार प्रवाहावर दार रविवारी आयपीएल मॅचच्या पार्श्वभूमीवर खास ‘क्रिकेट नाका’ कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. यामध्ये अतुल परचुरे, पुष्कर श्रोत्री, विजय केंकरे, विजय पटवर्धन आणि खुशबू तावडे यास अंदाजात दिसणार आहेत.