IND(L) vs SA(L) Road Safety World Series 2021: सचिनचे अर्धशक, युवराजची अष्टपैलू खेळीने इंडिया लेजेंड्सचा दक्षिण आफ्रिकेवर 56 धावांनी मोठा विजय

सचिन तेंडुलकरचे अर्धशतक आणि युवराज सिंहच्या वादळी खेळीच्या जोरावर इंडिया लेजेंड्सने 56 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह इंडिया लिजेंड्सने स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे.

युवराज सिंह आणि सचिन तेंडुलकर (Photo Credit: Twitter)

Road Safety World Series 2021: रायपूर (Raipur) येथे शनिवार, 13 मार्च रोजी दक्षिण आफ्रिका लेजेंड्स (South Africa Legends) संघाविरुद्ध इंडिया लेजेंड्सने (India Legends) मोठा विजय मिळविला. सचिन तेंडुलकरचे (Sachin Tendulkar) अर्धशतक आणि युवराज सिंहच्या (Yuvraj Singh) वादळी खेळीच्या जोरावर इंडिया लेजेंड्सने 56 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह इंडिया लिजेंड्सने स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. अष्टपैलू कामगिरी करणारा युवराज सामनावीरचा मानकरी ठरला. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज (Road Safety World Series) 2020/21 च्या या 13 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज कर्णधार जॉन्टी रोड्सने नाणेफेक जिंकल्यानंतर पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण या स्पर्धेच्या इतिहासात 200+ धावा करणारा भारत लेजेंड पहिला संघ बनला आणि निर्धारित 20 ओव्हरमध्ये 204/3 धावसंख्या गाठली. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका लेजेंड 20 ओव्हरमध्ये अखेरीस फक्त 148/7 धावाच करू शकले. (Road Safety World Series 2021: ‘सिक्सर किंग’ Yuvraj Singh याचे खणखणीत 4 षटकार, दक्षिण आफ्रिका लेजेंड्स गोलंदाजांची घेतली क्लास)

मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना सलामी जोडी अँड्र्यू पुटक आणि मॉर्ने व्हॅन विक यांनी पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी रचली. पण पुटिकला बाद करून युसुफ पठाणने ती भागीदारी तोडली. पुटिकने 35 चेंडूत 41 धावा केल्या. यांनतर, अन्य फलंदाज वाढत्या रनरेटचा दबाव हाताळण्यात अपयशी ठरले. लवकरच प्रज्ञान ओझाने दुसर्‍या सलामीवीर मोर्ने व्हॅन विकची विकेट घेतली. विकने 35 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 48 धावा फटकावल्या. त्यानंतर फक्त त्यांचा कर्णधार जॉन्टी र्‍होड्सने 20 पेक्षा अधिक धावा केल्या आणि दोन चौकारासह 21 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या. युसुफ पठाणने तीन गडी बाद केले तर युवराज सिंहला दोन विकेट मिळाल्या. तसेच प्रज्ञान ओझा आणि विनय कुमार यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

दुसरीकडे, पहिले फलंदाजी करणाऱ्या इंडिया लेजेंड्सकडून कर्णधार सचिनने 37 चेंडूत 60 धावा केल्या. त्यानंतर बद्रीनाथ पायात गोळा आला म्हणून 34 चेंडूत 42 धावांवर दुखापतग्रस्त होऊन बाद झाला. युसुफ पठाणने केवळ 10 चेंडूत 23 धावा फटकावल्या तर युवराज आणि मनप्रीत गोनीने डेथ ओव्हर्समध्ये आफ्रिकी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत अखेरच्या 22 चेंडूत विकेट न गमावता 63 धावा काढल्या. डावाच्या 18व्या ओव्हरमध्ये युवराजने झांडर डी ब्रूयनवर सलग चार षटकार ठोकले. युवराजने 22 चेंडूत नाबाद 52 (2 चौकार आणि 6 चौकार) धावा केल्या, तर गोनीने 9 चेंडूत (केवळ षटकार) नाबाद 16 धावा केल्या.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif