भारताचे विश्वचषक विजयी कोच गॅरी कर्स्टन इंग्लंड संघाचा प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीत, ECB कडून लवकरच होणार घोषणा
दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज आणि टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक गॅरी आता इंग्लंड संघाला प्रशिक्षण देतील. भारताला विश्वचषक जिंकवून देणारे माजी प्रशिक्षक कर्स्टन यांनी भारतीय क्रिकेट संघा व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका आणि इंडियन प्रीमियर लीगच्या अनेक संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहेत.
दक्षिण आफ्रिकाचे माजी कर्णधार गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) आता नवीन संघाचे कोच बनण्यास सज्ज आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज आणि टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक गॅरी आता इंग्लंड (England) संघाला प्रशिक्षण देतील. भारताला विश्वचषक जिंकवून देणारे माजी प्रशिक्षक कर्स्टन यांनी भारतीय क्रिकेट संघा (Indian Team) व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका आणि इंडियन प्रीमियर लीगच्या अनेक संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहेत. भारताच्या या यशात दक्षिण आफ्रिकेचे माजी सलामीवीर गॅरी यांचा मोलाचा वाटा होता. कर्स्टनच्या नेतृत्वात टीम इंडियाने वानखेडे येथे 2011 मध्ये 28 वर्षानंतर आपले दुसरे जागतिक विजेतेपद पटकावले. याशिवाय, त्यांनी दक्षिण आफ्रिकेला कसोटी क्रमवारीत पहिले स्थान मिळवून दिले. www.telegraph.co.uk च्या रिपोर्टनुसार, इंग्लंड क्रिकेटचे संचालक अॅश्ले जिल्स (Ashley Giles) यांनी गॅरी यांना कोच म्हणून नियुक्त करण्यासाठी प्रकरित्या सुरु केली आहे.
यंदा जुलै महिन्यात इंग्लंडला पहिला विश्वचषक जिंकवून देणारे कोच ट्रेवर बेलिस यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅशेस मालिकेनंतर कर्णधारपद सोडले. विश्वचषकनंतर काही दिवसांनी झालेली अॅशेस मालिका 2-2 ने ड्रॉ झाली. द टेलीग्राफच्या रिपोर्टनुसार, कर्स्टन सुरुवातीला इंग्लंडच्या वनडे संघाच्या प्रशिक्षण देण्यासाठी उत्सुक होते. पण, इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (England and Wales Cricket Board) त्यांना पूर्ण-वेळ मुख्य प्रशिक्षकाच्या नोकरीसाठी तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवाय, ईसीबी (ECB) गॅरी यांना दोन सहाय्यक प्रशिक्षक देण्याची ऑफर देऊन त्यांना फुल-टाइम कोच बनण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न करतील.
यंदा पहिला विश्वचषक जिंकल्यावर इंग्लंड बोर्ड टेस्ट क्रिकेटमध्ये देखील प्रभावी कामगिरी करण्याच्या निर्धारित आहे आणि क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटला प्राधान्य देत आहेत. जिल्स यांच्या मते, गॅरी इंग्लंड संघाला प्रशिक्षण देण्यासाठी उपयुक्त उमेदवार आहे आणि लवकरच त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली जाईल. दरम्यान, गॅरी यांना नुकतेच हंड्रेडमध्ये कार्डिफ फ्रँचायझीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते.