भारतीय फलंदाज अंबाती रायुडू ची क्रिकेटमधून निवृत्ती, World Cup साठी वारंवार केले जात होते दुर्लक्ष

रायुडूने या वर अजून काही भाष्य केला नाही पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयसीसी विश्वकपमध्ये आपली निवड न झल्या कारणाने रायुडूने हे पाऊल उचलले आहे.

(Photo Credit: ICC/Twitter)

भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडू (Ambati Rayudu) ने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रायुडूने या वर अजून काही भाष्य केला नाही. रायडूने सर्व फॉरमॅटमधून आणि आयपीएल मधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. दरम्यान याचे कारण त्याला वर्ल्ड कपमध्ये संधी दिली नाही त्यामुळं त्यानं हा निर्णय घेतला, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय संघात विश्वकपसाठी रायुडूऐजवजी अष्टपैलू विजय शंकर (Vijay Shankar) ची निवड करण्यात आली होती. या नंतर रायुडूला स्टॅन्ड-बाय वर ठेवले होते. मात्र, सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) ला दुखापती नंतरही रायुडूला वगळता रिषभ पंत (Rishabh Pant) ची निवड करण्यात आली. (ICC World Cup 2019: विश्वकपसाठी टीम इंडिया मध्ये नाही मिळाले स्थान म्हणून या देशाने अंबाती रायुडू ला नागरिकत्वाची ऑफर दिली)

दरम्यान, ऑलराउंडर शंकर दुखापतग्रस्त झाल्यानंतर राखीव ठेवण्यात आलेल्या रायडूला नाही तर मयंक अग्रवालला संघात स्थान देण्यात आले. यावर नेटकरी बीसीसीआयवर चांगलेच भडकले होते. गेल्या वर्षी रायडूनं प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

रायुडूने भारतासाठी 50 वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने 47.05 च्या सरासरीने 1694 धावा केल्या आहेत. यात तीन शतक आणि 10 अर्धशतक शामिल आहेत. दुसरीकडे, रायुडूने पाच टी-20 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहेत. त्यात त्याने 10.50 च्या सरासरीने 42 धावा केल्या आहेत.

विश्वकपसाठी 15 सदस्यीय संघाची निवडीपूर्वी, भारताचा चौथ्या क्रमांकाच्या खेळाडू म्हणून रायडूचे नाव आघाडीवर होते. मात्र, जेव्हा संघाची निवड झाली तेव्हा रायुडू ऐवजी विजय शंकर ची निवड करण्यात आली होती. रायडूऐवजी निवडला गेलेला विजय विश्ववकपमध्ये काहीशी चांगली कामगिरी करू शकला नाही. विजयला शिखरच्या जागी पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध संघात देण्यात आले होते. यंदाच्या विश्वकपमध्ये विजय 3 सामन्यात 58 धावा केल्या आणि 2 विकेट्स घेतले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif