India's Likely Playing XI for 2nd T20I: टीम इंडिया दुसऱ्या निर्णायक सामन्यात ‘या’ 11 खेळाडूंसोबत मैदानात उतरणार, 2 मोठे बदल होण्याची शक्यता

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला आणखी एक टी-20 मालिका जिंकायची असेल, तर त्यांना सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन संयोजनासह मैदानात उतरावे लागेल. विंडीज संघाविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारताचा संभावित प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे आहे.

टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs WI 2nd ODI: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात सुरू झालेल्या टी-20 मालिकेत भारताने विजयाने सुरुवात केली आहे. या विजयानंतर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नजरा दुसरा सामना जिंकून टी-20 मालिकेत विजयी आघाडी घेण्यावर आहे. तर दुसरीकडे किरोन पोलार्ड करा किंवा मरो या सामन्यात विजय मिळवून खाते उघडण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) होणार आहे. हा सामना जिंकून जर रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला (Team India) आणखी एक टी-20 मालिका जिंकायची असेल, तर त्यांना सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन संयोजनासह मैदानात उतरावे लागेल. विंडीज संघाविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारताचा संभावित प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे आहे. (IND vs WI 2nd T20I: भारतीय संघात खळबळ; विंडीज संघ उतरणार नव्या जोशात, ‘करो या मरो’च्या दुसऱ्या सामन्यात ‘या’ घातक अष्टपैलूचे आगमन निश्चित)

कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशनची जोडी पुन्हा एकदा सलामीला उतरेल. सलामीवीर म्हणून ‘हिटमॅन’कडे किशन आणि रुतुराज गायकवाड असे 2 मोठे पर्याय आहेत. पण एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडल्यानंतर गायकवाडला टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये संधीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते. तर विराट कोहली, रिषभ पंत आणि सूर्यकुमार यादव यांचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थान अबाधित असेल. विराट आणि पंत पहिल्या सामन्यात बॅटने फारसा प्रभाव पाडू शकले नाही तर सूर्यकुमार यादवने आक्रमक फलंदाजीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. तसेच सहाव्या क्रमांकावर बदल करणे खूप कठीण आहे. कारण पहिल्या T20 सामन्यात वेंकटेश अय्यरने आपल्या फिनिशिंग शैलीने हे सिद्ध केले आहे की तो फक्त संधी शोधत आहे.

सातव्या क्रमांकावर दुसरा अष्टपैलू खेळाडू म्हणून शार्दुल ठाकूरला मैदानात उतरवले जाऊ शकते. दीपक चाहरला गेल्या सामन्यात दुखापत झाली होती त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्याला विश्रांती देऊन शार्दूलला समावेश केला जाऊ शकतो. एकंदरीत दीपकची कामगिरी चांगली असली तरी, दुसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित पर्याय म्हणून शार्दुलचा विचार करू शकतात. भुवनेश्वर कुमारचे स्थान कायम राहील. तर युजवेंद्र चहल आणि रवी बिष्णोई देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसतील. अशाप्रकारे भारतीय लाईन-अपमध्ये दोन बदल होताना दिसत आहे.

भारताचा संभावित प्लेइंग XI: रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, शार्दूल ठाकूर, हर्षल पटेल/मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि रवी बिष्णोई.