India's Likely Playing XI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडेत अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11, उपकर्णधार केएल राहुल IN तर कोण होणार आऊट

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकलेल्या टीम इंडियाचे लक्ष आता दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचे असेल. उपकर्णधार केएल राहुलसाठी कोणत्या फलंदाजाला बाहेर केले जाईल याबाबत उत्सुकता लागून आहे. विंडीजविरुद्ध भारताचा संभावित प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे आहे.

रोहित शर्मा आणि ईशान किशन (Photo Credit: PTI)

India's Likely Playing XI 2nd ODI: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडिया (Team India) बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) दुसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकलेल्या टीम इंडियाचे लक्ष आता दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचे असेल. साहजिकच यासाठी टीम इंडियाला प्लेइंग इलेव्हनची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी लागणार आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी म्हणजे आता उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल संघात परतले आहेत, तसेच कोविडमधून बरा होऊन नवदीप सैनीही संघात सामील झाला आहे आणि त्याने सरावही केला आहे. तथापि या खेळाडूंनी आता कर्णधार रोहित आणि संघ व्यस्थापनची प्लेइंग इलेव्हन निवडण्याची डोकेदुखी वाढवली असेल. (IND vs WI 2nd ODI: ईशान किशन की सूर्यकुमार यादव? KL Rahul च्या परतल्याने कोणाचा होणार पत्ता साफ, कर्णधार रोहित शर्मापुढे मोठा प्रश्न)

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या मालिकेच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय इलेव्हनमध्ये अधिक बदल होताना दिसत नाही आहे. पण उपकर्णधार राहुलसाठी कोणत्या फलंदाजाला बाहेर केले जाईल याबाबत उत्सुकता लागून आहे. राहुलच्या पुनरागमन नंतर 23 वर्षीय ईशान किशनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडावे लागण्याची शक्यता अधिक आहे. किशनने कॅरेबियन संघाविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात 36 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 28 धावा केल्या. मात्र राहुलचा विंडीजविरुद्ध प्रभावी रेकॉर्ड आणि संघातील स्थान लक्षात घेता किशनला संघात ठेवलं जातं की वगळलं जातं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. किशनशिवाय संघातून वगळण्याची गरज असलेला दुसरा खेळाडू दिसत नाही. विराट कोहली, त्यानंतर रिषभ पंत आणि सूर्यकुमार यादव व दीपक हुडा अशी भारतीय मधली फळीही चांगली दिसत आहे.

फिरकीपटूंबद्दल बोलायचे झाले तर वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल यांनी शानदार गोलंदाजी केली. सुंदरने तीन विकेट घेतले, तर चहलने चार विकेट घेतल्या होत्या. पण खेळपट्टी पाहता त्याना प्लेइंग इलेव्हनमधून वगळणे कुठेही योग्य वाटत नाही. याशिवाय वेगवान गोलंदाजीत मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाची गोलंदाजी चांगलीच होती. शार्दुल ठाकूर तितका प्रभावी दिसत नसल्याने दीपक चाहरला कदाचित संधी दिली जाईल.

भारताचा संभावित प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, आणि प्रसिद्ध कृष्णा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now