How To Watch IND vs SA 3rd T20 Live Streaming: तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न, कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह?
पहिला टी-20 सामना पावसामुळे वाहून गेला, तर पावसाने व्यत्यय आणलेल्या दुसऱ्या टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेने डीएलस अंतर्गत 5 गडी राखून विजय मिळवला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA 3rd T20) मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना गुरुवारी म्हणजेच 14 डिसेंबर रोजी आज खेळवला जाईल. या सामन्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या (SuryaKumar Yadav) नेतृत्वाखालील संघाला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे. पहिला टी-20 सामना पावसामुळे वाहून गेला, तर पावसाने व्यत्यय आणलेल्या दुसऱ्या टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेने डीएलस अंतर्गत 5 गडी राखून विजय मिळवला. सध्या यजमान संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. दरम्यान, आता टीम इंडियाचा प्रयत्न मालिकेत बरोबरी साधण्याचा आहे. पॉवरप्लेमध्ये रणनीती बदलावी लागेल, असे सूर्यकुमार यादवने आधीच स्पष्ट केले आहे. (हे देखील वाचा: Shikhar Dhawan Viral Video: शिखर धवन पुन्हा मैदानात परतला, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल गब्बर इज बॅक)
कधी अन् कुठे पाहणार सामना?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक 8 वाजता होईल. तुम्ही हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहू शकता तसेच या सामन्याचे थेट प्रवाह Disney+ Hotstar अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
टी-20 विश्वचषकाची तयारी
टी-20 नंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेसोबत वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही टी-20 मालिका आणि जानेवारीमध्ये अफगाणिस्तान विरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका हे एकमेव आंतरराष्ट्रीय सामने आहेत जे पुढील वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी भारताकडे आहेत. पावसामुळे एक सामना गमावल्यानंतर आणि प्रोटीजविरुद्ध दुसरा सामना गमावल्यानंतर 'मेन इन ब्लू'साठी आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे निकाल लागलेले नाहीत. मात्र, टीम इंडियाने टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 4-1 असा पराभव केल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला आहे.