1985 ची भारतीय टीम देऊ शकते विराट कोहली याच्या सेनेला मायादित ओव्हरमध्ये देऊ शकते आव्हान: रवि शास्त्री

सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट विश्व चँपियनशिप जिंकणार्‍या 1985 संघाचे शास्त्री महत्त्वाचे सदस्य होते.

विराट कोहली, रवि शास्त्री (Photo Credit: Getty)

1985 मध्ये वनडे खेळणारी भारतीय टीम (Indian Team) इतकी मजबूत होती की विराट कोहली याच्या नेतृत्वातील सध्याच्या संघालाही आव्हान देऊ शकली असती असे भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांचे मत आहे. सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट विश्व चँपियनशिप (World Championship) जिंकणार्‍या 1985 संघाचे शास्त्री महत्त्वाचे सदस्य होते. ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियनशिपमध्ये ते भारतीय विजयाचे नायक होते आणि जेव्हा त्यांना स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडले गेले तेव्हा त्यांना प्रसिद्ध 'ऑडी' कारचा पुरस्कार म्हणून देण्यात आली होती. शास्त्री सध्या भारतीय क्रिकेट टीमच्या मुख्य प्रशिक्षकाचे महत्त्वाचे पद सांभाळत आहेत आणि जागतिक क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात संघाच्या चांगल्या कामगिरीमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शास्त्री 'सोनी टेन पिटस्टॉप' कार्यक्रमात म्हणाले, "यात काही शंका नाही. तो (1985 संघ) कोणत्याही भारतीय मर्यादित षटकांच्या संघासमोर कडक आव्हान सादर करेल. ती 1985 ची संघ सध्याच्या संघालाही त्रास देईल." (ICC Rankings: ऑस्ट्रेलियाचा टीम इंडिया, पाकिस्तानला दे धक्का; आयसीसी टेस्ट आणि टी-20 रँकिंगमध्ये मिळवले अव्वल स्थान)

1983 विश्वचषक विजेत्या संघापेक्षा युवा संघ आणि अनुभव यांचे चांगले मिश्रण असल्यामुळे 1985 ची टीम चांगली होती, असेही शास्त्री यांचे मत आहे. ते म्हणाले की, "1985 चा संघ 1983 पेक्षा मजबूत होतामाझाही विश्वास आहे. मी दोन्ही संघांचा एक भाग होता. मी 1983 वर्ल्ड कपमध्ये खेळलो आणि 1985 मध्ये जर तुम्ही प्रत्येक खेळाडूकडे पाहिले तर त्यात 1983 च्या 80 टक्के खेळाडूंचा समावेश होता. पण त्यादरम्यान शिवरामकृष्णन, सदानंद विश्वनाथ, अजरुद्दीन हे तरूण खेळाडू संघात आले होते. आमच्याकडे आधीपासूनच अनुभवी खेळाडू होते आणि त्यांच्या सहभागामुळे संघ विलक्षण बनला."

शास्त्री पुढे म्हणाले की, 2018-19 मध्ये 71 वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलियामध्ये हा विशेष विजय होता, पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा विचार केला तर 1985 टीमची बातच निराळी होती. ते म्हणाले, "या दोन संघात भाग घेणे फारच शानदार आहे. ऑस्ट्रेलियाचा त्यांच्या भूमीवर पराभव करणे फार कठीण होते कारण 71 वर्षांपासून कोणत्याही आशियाई संघाला असे करता आले नाही."