Women's Asia Cup, India Squad: आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर, 'हे' 15 खेळाडू सातव्यांदा विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज

शेवटच्या वेळी हे 2018 मध्ये आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये बांगलादेश संघाने भारताचा पराभव करून प्रथमच विजेतेपदावर कब्जा केला होता.

Womens Team India (Photo Credit - Twitter)

आशिया कप 2022 (Asia Cup 2022) साठी भारतीय महिला क्रिकेट संघाची (Indian Women's Cricket Team) घोषणा करण्यात आली आहे. बांगलादेशमध्ये 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान होणार्‍या या स्पर्धेची धुरा हरमनप्रीत कौरच्या हातात आहे, तर स्मृती मानधना उपकर्णधार असेल. इंग्लंड दौऱ्यावर उपस्थित असलेल्या बहुतांश खेळाडूंना 15 सदस्यीय संघात स्थान मिळाले आहे. तानिया सपना भाटिया आणि सिमरन दिल बहादूर यांना स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे. चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. शेवटच्या वेळी हे 2018 मध्ये आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये बांगलादेश संघाने भारताचा पराभव करून प्रथमच विजेतेपदावर कब्जा केला होता. मात्र, भारतीय संघ हा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे आणि त्याने सात हंगामात सहा वेळा विजेतेपद पटकावले आहे आणि एकदा उपविजेता ठरला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 'या' दिवशी होणार सामना

आशिया चषक स्पर्धेत एकूण सात संघ प्रथमच भाग घेणार आहेत. ज्यामध्ये प्रत्येक संघ बाद फेरीपूर्वी राऊंड रॉबिन स्वरूपात सात सामने खेळेल. भारतीय संघ 1 ऑक्टोबरला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात करेल. तर 7 ऑक्टोबरला तो पाकिस्तानशी भिडणार आहे. (हे देखील वाचा: ICC Women's T20I Rankings: स्मृती मानधनाची ICC Ranking मध्ये 'गरुडझेप', एकदिवसीय सामन्यांमध्येही तिने केली जबरदस्त कामगिरी)

भारतीय संघ:

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, सबिनेनी मेघना, रिचा घोष (डब्ल्यूके), स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंह, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, के.पी. नेव्हीग्रे

स्टँडबाय खेळाडू: तानिया सपना भाटिया, सिमरन दिल बहादूर.

पाहा संपूर्ण वेळापत्रक 

1 ऑक्टोबर: भारत विरुद्ध श्रीलंका, दुपारी 1:30 वा

3 ऑक्टोबर: भारत विरुद्ध मलेशिया, दुपारी 1:30 वा

4 ऑक्टोबर: भारत विरुध्द UAE, दुपारी 1:30 वा

7 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान, दुपारी 1:30 वा

8 ऑक्टोबर: भारत विरुद्ध बांगलादेश, दुपारी 1:30 वा

10 ऑक्टोबर: भारत विरुद्ध थायलंड, दुपारी 1:30 वा