फरिदाबादचा सिक्स-ए-साइड संघ मलेशियातील 50 व्या Kuantan CA International Sixes टूर्नामेंट खेळण्यास सज्ज

फरीदाबाद येथील रवींद्र फग्ना क्रिकेट अकादमीआणि डब्ल्यूसीएलचे खेळाडू 50 व्या क्वॉटन सीए आंतरराष्ट्रीय सिक्स स्पर्धेत सहभागी होतील.

रवींद्र फग्ना क्रिकेट अकादमी (Photo Credits: Facebook)

हरियाणा (Haryana) च्या फरीदाबाद (Faridabad) शहरातील एक संघ मलेशिया (Malaysia) मध्ये होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहे. फरीदाबाद येथील रवींद्र फग्ना क्रिकेट अकादमी (Ravindra Fagna Cricket Aacademy) आणि डब्ल्यूसीएलचे खेळाडू 50 व्या क्वॉटन सीए आंतरराष्ट्रीय सिक्स स्पर्धेत सहभागी होतील. शुक्रवारी सुरु होणाऱ्या या सिक्स-ए-साइड स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रविंद्र फग्ना क्रिकेट अकादमी आणि जिल्हा परिषदेचे खेळाडू बुधवारी संध्याकाळी रवाना झाले. या खेळाडूंचा मेयर सुमन बाला, ज्येष्ठ उपमहापौर देवेंद्र चौधरी, भाजप नेते अमन गोयल, नगरसेवक मनोज नस्वा, नांगला मंडलचे अध्यक्ष कविदर चौधरी यांनी शुभेच्छा देत त्यांना विदाई केली. रविंदर फग्ना क्रिकेट अकादमीचे मुख्य प्रशिक्षक धर्मेंद्र फग्ना म्हणाले की मलेशियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे 26-28 जुलैपर्यंत आयोजन होणार आहे. (IND vs WI: टीम इंडियाच्या निवडीवरून सौरव गांगुली आणि विनोद कांबळी यांच्यात Twitter वर शाब्दिक चकमक)

कुआंतान सीए इंटरनॅशनल सिक्स हा एक सहा संघाची क्रिकेट स्पर्धा आहे. सहा संघामधील ही स्पर्धा मलेशियाच्या कुआंतान शहरात खेळली जाणार आहे. भारत ऐवजी पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या देशातील इतर संघ देखील स्पर्धेचा भाग बनणार आहेत. रविंद्र फग्ना क्रिकेट अकादमीने त्यांच्या फेसबुक पेजवरील क्रिकेट टूर्नामेंटमध्ये त्यांच्या खेळाडूंच्या सहभागाविषयी माहिती दिली. या क्रिकेट अकादमीने त्यांच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी सांगितले की त्यांच्या खेळाडूंना जागतिक दर्जाची क्रिकेट सुविधा मिळत आहेत. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्यास मिळत आहे.

भारतीय संघात पुनीत कुकरेजा, सुमित अब्बी, वसीम राजा, अनुराग सिंह, सचिन रक्षवाल, मुशीर रियाज, आदिल कुरैशी तथा मैनेजर हितेश शर्मा, राकेश बाथरा और विशाल राजदान यांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक हितेश शर्मा, राकेश बाथरा आणि विशाल राजधान यांनीदेखील मलेशियातील या स्पर्धेसाठी प्रस्थान केले.