क्रिकेट: 2019 मध्ये खेळाडूंचं हे त्रिकूट टीम इंडियातून करणार पदार्पण

2018 हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी यशाच्या दृष्टीने संमिश्र असेच ठरले. काही सामन्यांमध्ये आणि मालिकांमध्ये टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. मात्र, काही सामन्यांत टीम इंडियाला नामुश्कीजनक पराभावालाही सामोरे जावे लागले. त्यामुळे 2019मध्ये टीम इंडियात मोठे फेरबदल होतील हे सांगायलाच नको. हे बदल झाल्यास काही मंडळींना विश्रांती तर, काही नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.

Ishan Kishan, Shubman Gill and Rajneesh Gurbani | (Archived and representative images)

Indian Cricket Team 2019: सन 2019 हे वर्ष क्रिकेट विश्वासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातही खास करुन ईशान किशन (Ishan Kishan), शुभमन गिल (Shubman Gill) आणि रजनीश गुरबानी (Rajneesh Gurbani) या त्रिकूटासाठी 2019 हे वर्ष करिअरसाठी मोठी भेट देऊ शकते. या तीन्ही खेळाडूंना यंदा आंतररष्ट्रीय क्रिकेट संघात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते अशी चर्चा आहे. 2018 हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी यशाच्या दृष्टीने संमिश्र असेच ठरले. काही सामन्यांमध्ये आणि मालिकांमध्ये टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. मात्र, काही सामन्यांत टीम इंडियाला नामुश्कीजनक पराभावालाही सामोरे जावे लागले. त्यामुळे 2019मध्ये टीम इंडियात मोठे फेरबदल होतील हे सांगायलाच नको. हे बदल झाल्यास काही मंडळींना विश्रांती तर, काही नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. या खेळाडूंमध्येच प्रामुख्याने ईशान किशन, शुभमन गिल आणि रजनीश गुरबानी यांची नावे घेतली जात आहेत. या तिन्ही खेळाडूंच्या आजवरच्या कामगिरीवर टाकलेला हा अल्पसा कटाक्ष.

ईशान किशन:

मुळचा झारखंडचा असलेला ईशान किशन हा आपल्या तडाखेबंद फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने 2016 मध्ये झालेल्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. 2018च्या आयपीएल सामन्यात तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला आहे. आयपीएलमध्ये विशेष कामगिरीमुळे तो चर्चेत होता. 2019मध्ये निवडसमिती किशनच्या नावावर मोहोर उठवू शकतात.

शुभमन गिल:

शुभमन गिल याच्याकडे टीम इंडियाचा उगवता तारा म्हणून पाहिले जाते. अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत शानदार कामगिरी केल्यानंत त्याला 'प्लेयर ऑफ टूर्नामेंट' पुरस्कारने सन्मानित करण्यता आले होते. आयपीएलसाठी तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. पण, 2018मध्ये झालेल्या आयपीएलमध्ये त्याला फलंदाजीसाठी फारशी संधी मिळाली नाही. (हेही वाचा, 2019 मध्ये विराट सेनेतील हे '5' क्रिकेटपटू अडकतील विवाहबंधनात!)

रजनीश गुरबानी:

रजनीश गुरबानी हा सुद्धा भारतीय क्रिकेट संघाचा उभरता खेळाडू आहे. फंलंदाजासाठी घातग गोलंदाज अशी त्याची ओळख आहे. त्याच्या मारग गोलंदाजीमुळेच विदर्भ टीम 2017-18 या वर्षातील रजणी सामन्यांत चॅम्पीयन ठरली. वय वर्षे 24 असलेल्या या खेळाडूने विजय हजारे ट्रॉफीमध्ये 10 डिसेंबर 2015मध्ये पदार्पण केले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now