Gautam Gambhir's Mother Heart Attack: भारतीय कोच गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका, अचानक इंग्लंड मालिका सोडून भारतासाठी रवाना

गौतम गंभीर 7 जून रोजी संघासह लंडनला पोहोचला. संघ सध्या बेकेनहॅममध्ये सराव करत आहे. आजपासून येथे संघातील अंतर्गत सराव सामना खेळला जाणार आहे, परंतु त्यापूर्वी त्यांना संघापासून वेगळे होऊन भारतात परतावे लागले. तथापि, 20 जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटीपूर्वी तो इंग्लंडमध्ये संघासोबत असेल.

Gautam Gambhir (Photo Credit- X)

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये होणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे. दरम्यान, एक मोठी बातमी आली आहे, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhitr) भारतात परतत आहेत. त्यांच्या आईला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. गौतम गंभीर 7 जून रोजी संघासह लंडनला पोहोचला. संघ सध्या बेकेनहॅममध्ये सराव करत आहे. आजपासून येथे संघातील अंतर्गत सराव सामना खेळला जाणार आहे, परंतु त्यापूर्वी त्यांना संघापासून वेगळे होऊन भारतात परतावे लागले. तथापि, 20 जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटीपूर्वी तो इंग्लंडमध्ये संघासोबत असेल.

कशी आहे गौतम गंभीरच्या आईची तब्येत ?

गौतम गंभीरच्या आईचे नाव सीमा गंभीर आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ते सध्या आयसीयूमध्ये दाखल आहे, परंतु चांगली गोष्ट म्हणजे ते धोक्याबाहेर आहे. आत्ता मिळालेल्या माहितीनुसार, गंभीर 17 जून रोजी इंग्लंडला परतणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. (हे देखील वाचा: IND vs ENG Test Series 2025: गौतम गंभीरने इंग्लंड दौरा 'स्मरणीय' बनवण्याचा दिला गुरुमंत्र, गिल आणि संघात भरली नवी ऊर्जा)

2007 पासून भारताने इंग्लंडमध्ये एकही मालिका जिंकलेली नाहीी!

तुम्हाला सांगतो की भारतीय क्रिकेट संघाने 18 वर्षांपासून इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. या काळात, एमएस धोनी आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, संघाने इंग्लंडमध्ये 2-2 कसोटी मालिका खेळल्या, त्यापैकी 3 गमावल्या आणि 3 अनिर्णित राहिल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement