IND Beat BAN: भारताने तिसरा एकदिवसीय सामना जिंकला, बांगलादेशचा 227 धावांनी केला पराभव
टीम इंडियाने प्रथम खेळताना इशान किशनच्या 210 आणि विराट कोहलीच्या 113 धावांच्या शानदार खेळीमुळे 8 विकेट गमावत 409 धावा केल्या.
IND vs BAN 3rd ODI 2022: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका संपुष्टात आली आहे. भारताने पहिले दोन सामने जिंकल्यानंतर अखेरच्या एकदिवसीय सामन्यात यजमान संघाचा 227 धावांनी पराभव केला. या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर टीम इंडियाने (Team India) वनडे क्रिकेटमधील तिसरी सर्वोच्च धावसंख्या केली. टीम इंडियाने प्रथम खेळताना इशान किशनच्या 210 आणि विराट कोहलीच्या 113 धावांच्या शानदार खेळीमुळे 8 विकेट गमावत 409 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 410 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 34 षटकांत 182 धावांवर गारद झाला.
इशान किशन आणि विराट कोहली भारताच्या विजयाचे हिरो ठरले. किशनने 210 धावांची इनिंग खेळली. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. अनुभवी विराट कोहलीने 113 धावांची खेळी खेळली. वॉशिंग्टन सुंदरने शेवटच्या षटकात 27 चेंडूत 37 धावा केल्या. गोलंदाजीत शार्दुल ठाकूरने टीम इंडियाकडून सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज, अक्षर पटेल आणि उमरान मलिक यांना 1-1 यश मिळाले. (हे देखील वाचा: Virat Kohli ने 3 वर्षांनंतर ODI मध्ये ठोकले शतक, पाँटिंगला टाकले मागे)
बांगलादेशबद्दल बोलायचे झाले तर त्याच्यासाठी शकीब अल हसनने 50 चेंडूत 43 धावा केल्या. कर्णधार लिटन दास 29, यासिर अली 25 आणि महमुदुल्ला 20 धावा करून बाद झाले. त्याच्याकडून गोलंदाजीत तस्किन अहमद, इबादत हुसेन आणि शकीब अल हसन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. मुस्तफिजुर रहमान आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी एक यश मिळाले.