IND vs ENG T20I Series: इंग्लंड दौऱ्यावर भारत खेळणार 5 टी-20 सामन्यांची मालिका, 'या' खेळाडूंना मिळाली संधी; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

भारत व इंग्लंड महिला टी20 मालिका 28 जूनपासून सुरू होणार आहे. जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक, खेळाडूंचा संघ व महत्त्वाची माहिती एका क्लिकवर!

IND W vs ENG W

England Women vs India Women T20I: भारतीय पुरुष क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे, ज्यामध्ये भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात पाच विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. आता भारतीय महिला संघ 28 जूनपासून इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. त्यांचा संघ आधीच जाहीर करण्यात आला होता, ज्यामध्ये हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. स्मृती मानधना यांना उपकर्णधार बनवण्यात आले होते. आता मालिका सुरू होण्यापूर्वी, दोन्ही संघांमधील रेकॉर्ड काय आहे आणि कोणत्या तारखेला कोणता सामना खेळला जाईल ते जाणून घेऊया.

भारतीय संघात स्टार खेळाडू 

भारतीय संघाची फलंदाजी मुख्यत्वे हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष आणि दीप्ती शर्मा यांच्यावर अवलंबून आहे. गोलंदाजीत अरुंधती रेड्डी, स्नेह राणा, अमनजोत कौर आणि दीप्ती शर्मा उपस्थित आहेत. भारतीय संघाला या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. (हे देखील वाचा: ICC Cricket Rules: आयसीसी लवकरच बदलणार क्रिकेटचे 5 मोठे नियम, क्षेत्ररक्षक संघाची डोकेदुखी वाढणार!)

इंग्लंडचा वरचष्मा

भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात आतापर्यंत एकूण 30 टी-20 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारतीय महिला संघाने 8 सामने जिंकले आहेत. तर 22 सामने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशाप्रकारे, इंग्लंडविरुद्ध भारतीय महिला संघाचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला आहे.

भारत आणि इंग्लंडमधील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचे वेळापत्रक

सामना दिनांक स्थळ
पहिला टी-20 28 जून नॉटिंगहॅम
दुसरा टी-20 1 जुलै ब्रिस्टल
तिसरा टी-20 4 जुलै लंडन
चौथा टी-20 9 जुलै मँचेस्टर
पाचवा टी-20 12 जुलै बर्मिंगहॅम

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाचे वेळापत्रक

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (व्हीसी), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, शुची उपाध्याय, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सतघरे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement