Live Streaming of IND vs WI, 3rd T20I Match: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर

भारत आणि वेस्ट इंडिजचा आजचा हा सामना तुम्ही ऑनलाइन Hotstar आणि Star Sports वर पाहु शकता.

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघ आज तिसऱ्यांदा आणि अंतिम वेळा यंदाच्या टी-20 च्या मालिकेत आमने-सामने येतील. भारत-वेस्ट इंडिज मधील तिसरा टी-20 सामना गायनाच्या प्रोविडेंस स्टेडियममध्ये खेळाला जाईल. यापूर्वी दोन्ही संघातील पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले. आणि दोन्ही सामन्यात विजय मिळवला. भारताने पहिले दोन्ही सामने जिंकून मालिका 2-0नं खिशात घातली आहे. भारतीय संघाने 8 वर्षांनी विंडीजविरुद्ध टी-20 मालिका जिंकली आहे. पहिल्यास सामन्यात भारताला विजयासाठी झगडाव लागलं. पण दुसऱ्या सामन्यात त्यांनी एकतर्फी विजय मिळवला. (युजवेंद्र चहल चा भुवया उडवतानाचा डान्स पाहून नेटक-यांनी केला मजेशीर मिम्सचा भडिमार)

भारत आणि वेस्ट इंडिजचा आजचा हा सामना तुम्ही ऑनलाइन Hotstar आणि Star Sports वर पाहु शकता.

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचा विश्वचषक मधील फॉर्म कायम आहे. भारताकडून दोन्ही सामन्यात त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) फॉर्ममध्ये आहेत. आजच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. केएल राहुल (KL Rahul) आणि चाहर  बंधू  दीपक (Deepak Chahar) आणि राहुल चाहर (Rahul Chahar) यांना संधी मिळू शकते. दुसरीकडे, यजमान विंडीजसमोर मोठे आव्हान असेल. पहिल्या सामन्यातील गोलंदाजी वगळता दुसऱ्या सामन्यात विंडीजच्या गोलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही. परिणामी टीम इंडियाला मोठा स्कोर करण्यास यशस्वी झाली. तसेच एमएस धोनी याच्या जागी खेळवल्या गेलेल्या रिषभ पंत याला डच्चू दिला जाऊ शकतो. वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या दोन्ही सामन्यात पंत प्रभावी खेळी करण्यास अयशस्वी राहिला. पहिल्या टी-20 सामन्यात पंतने 0 तर दुसऱ्या सामन्यात 4 धावा केल्या होत्या. त्यामुळे पंतऐवजी राहुलला जागी संधी मिळू शकते. दरम्यान, फलंदाजीत देखील दोन्ही सामन्यात सलामीची जोडी अपयशी ठरली. किरन पोलार्ड (Kieron Pollard) याला वगळता एकही फलंदाज फटकेबाजी करू शकला नाही. आणि आता आजच्या सामन्यात क्लीन स्वीप टाळण्यासाठी विंडीजला विजयाची गरज आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif