Live Streaming of IND vs WI, 3rd ODI Match: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Sony Ten आणि SonyLiv Online वर

आज होणाऱ्या अंतिम वनडेमध्ये भारताला वेस्ट इंडिजला पुन्हा एकदा या दौऱ्यावर क्लीन स्वीप करण्याची संधी आहे.

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघ वनडे मालिकेत तिसऱ्या आणि अंतिम वेळी आमने-सामने येण्यास सज्ज आहे. टीम इंडिया आणि विंडीजमधील तिसरी वनडे त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळली जाईल. दुसरा वनडे सामना भारताने जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून घेतली आहे. पहिली वनडे मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे आज होणाऱ्या अंतिम वनडेमध्ये भारताला वेस्ट इंडिजला पुन्हा एकदा या दौऱ्यावर क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. याआधी टीम इंडियाने 3 सामन्यांची टी-20 मालिका जिंकत विंडीजचा व्हाईट वॉश केला होता. दुसऱ्या मॅचप्रमाणेच या सामन्यावर देखील पावसाचे संकट आहे. दुसऱ्या वनडेमध्ये पावसामुळे खेळात वारंवार व्यत्यय आला होता. (IND vs WI 3rd ODI Weather Forecast: पावसामुळे भारत-विंडीज मॅचवर पावसाचे संकट, जाणून घ्या पोर्ट ऑफ स्पेनमध्ये कसे असेल हवामान)

भारत आणि वेस्ट इंडिजमधील तिसरा वनडे सामना तुम्ही ऑनलाइन Sony Ten SD/HD आणि Sony Ten 3 SD/HD आणि SonyLiv Online वर पाहु शकता.

दरम्यान, आजचा सामना विंडीज संघासाठी महत्वाचा असणार आहे. त्यांचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेल (Chris Gayle) याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अंतिम सामना असणार आहे. त्यामुळे, संघ त्याला विजयी सेंडऑफ देण्याच्या निर्धारित असेल. वेस्ट इंडिज जिंकला तर सामना 1-1 च्या बरोबरीत राहील. मागील दोन्ही सामन्यात गेल काही विशेष करता आले नाही. म्हणून आपल्या अंतिम आंतरराष्ट्रीय सामन्यात तरी गेलच्या बॅटमधून मोठी धाव संख्या होते की नाही यावर सर्वांचे लक्ष लागून असणार आहे. भारतीय संघ सध्या प्रभावी कामगिरी करत आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये त्यांची चांगले काम केले आहेत. पण, चिंतेची बाब म्हणजे त्यांची सलामीची जोडी. मागील टी-२० मध्ये देखील शिखर धवन आणि रोहित शर्मा यांना मोठा स्कोर करता आला नाही. धवन नुकताच दुखापतीतून सावरला आहे तर रोहित देखील विश्वचषकमधील त्यांचा फॉर्म कायम ठेवण्यात अयशस्वी राहिला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif