Live Streaming of IND vs WI, 2nd Test Day 1: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Sony Ten आणि SonyLiv Online वर
भारत आणि वेस्ट इंडिजमधील दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसाचा सामना तुम्ही ऑनलाइन Sony Ten SD/HD आणि Sony Ten 3 SD/HD आणि SonyLiv Online वर पाहु शकता.
भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यात दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना आजपासून सबिना पार्क येथे खेळला जाणार आहे. अँटिगा कसोटीत भारताने 318 धावांनी विजय मिळवत टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. टी-20 मालिकेत भारताने 3-0 क्लीन स्वीप जिंकला होता आणि वनडे मालिकेत 2-0 ने क्लीन स्वीप केलं होत. टीम इंडिया आणखी एका विजयासह आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट टेबलमध्ये स्वतःचे स्थान आणखी मजबूत करण्याच्या निर्धारात असेल तर वेस्ट इंडीज संघ या दौर्यावर पहिला विजय नोंदवण्याच्या इच्छेने मैदानात उतरेल. दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह याने अवघे 7 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या तर इशांतने पहिल्या डावात 5 गडी बाद केले होते. विंडीजविरुद्ध संपूर्ण मालिकेत भारतीय गोलंदाजांनी आपले वर्चस्व कायम ठेवले. दुसऱ्या सामन्यातही बाजी मारत विंडीज दौऱ्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. (IND vs WI 2nd Test: जमैकामध्ये पावसामुळे टॉसला विलंब होण्याची शक्यता, जाणून घ्या पहिल्या दिवशी हवामानाचा अंदाज)
भारत आणि वेस्ट इंडिजमधील दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसाचा सामना तुम्ही ऑनलाइन Sony Ten SD/HD आणि Sony Ten 3 SD/HD आणि SonyLiv Online वर पाहु शकता.
पहिल्या सामन्यात टीम इंडियासाठी अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारीने शानदार प्रदर्शन केले. गोलंदाजीत ईशांत शर्मा आणि बुमराह घातक ठरले. आणि आता दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात या खेळाडूंकडून भारत पुन्हा एकदा अशा प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा करेल. या दौर्यावरील हा टीम इंडियाचा शेवटचा सामनादेखील असेल. आजपासून सुरु होणाऱ्या सामन्यात कर्णधार विराट कोहली, इशांत यांना विक्रमी खेळी करण्याची संधी आहे. एकीकडे इशांत माजी कर्णधार कपिल देव यांना पिछाडीवर टाकू शकतो तर विंडीजविरुद्ध सामना जिंकत कोहली भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार बानू शकतो.