IND vs WI 1st ODI: भारत-वेस्ट इंडिज वनडे सामन्यात पावसामुळे व्यत्यय, टॉस उशिराने
दोन्ही संघातील दुसऱ्या टी-20 सामन्यात देखील पावसाने अडथळा निर्माण केला होता. वेस्ट इंडिजसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. विंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याची ही अखेरची वनडे मालिका असणार आहे.
टी-20 मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज संघाशी वनडे मालिकेत दोन हाथ करण्यासाठी सज्ज आहे. पण सध्या मुसळधार पावसामुळे टॉसला उशीर होणार असल्याचे समजले आहे. दोन्ही संघातील दुसऱ्या टी-20 सामन्यात देखील पावसाने अडथळा निर्माण केला होता. विंडीज संघ केवळ 15 ओव्हर खेळू शकला. त्यामुळे आज तरी देखील चाहत्यांना पूर्ण 50 ओव्हर्सचा सामना पाहायला मिळणार की नाही यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. विश्वचषकमधील पराभवानंतर आज भारत-वेस्ट इंडिज आज पहिली वनडे मालिका सामना खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे. (Live Streaming of IND vs WI, 1st ODI Match: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Sony Ten आणि SonyLiv Online वर)
दुसरीकडे वेस्ट इंडिजसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. विंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याची ही अखेरची वनडे मालिका असणार आहे. भारत विरुद्ध मालिकेनंतर गेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. त्यामुळे विंडीज संघ पहिला सामना जिंकण्यासाठी उत्सुक असेल. शिवाय टी-20 मधील पराभवानंतर यजमान संघ चांगले प्रदर्शन करण्यास सज्ज असेल. आजच्या या सामन्यात दोन्ही संघात महत्वाचे बदल अपेक्षित आहे. टी-20 मधील फलंदाजी पाहता रोहित शर्मा सलामीला कायम असल्याचे दिसत आहे. पण, त्याचा जोडीदार शिखर धवन याचा फॉर्म काही संतोषजनक दिसत नाही. त्यामुळे केएल राहुल याला संधी मिळते की नाही हे पाहावे लागणार आहे. टी-20 सामन्यात धवनला चांगली फलंदाजी करता आली नाही. तर, तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली असेल. आणि चौथ्या क्रमांकावर रिषभ पंत, मनीष पांडे किंवा श्रेयस अय्यर या तीन फलंदाजांपैकी एकाला संधी मिळू शकते.
असा असेल भारताचा संभाव्य संघ: रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कॅप्टन), रिषभ पंत, मनीष पांडे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी आणि मोहम्मद शमी