India vs Sri Lanka 1st ODI 2021: भारत आज श्रीलंकेशी भिडणार, जाणून घ्या प्रेमादासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमचा पिच अहवाल आणि हवामान विभागाचा अंदाज

शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करणारा 25वा खेळाडू ठरेल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना (India vs Sri Lanka 1st ODI 2021) आज प्रेमादासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर (Premadasa International Cricket) खेळला जाणार आहे. या दौऱ्यात भारताचा सलामीवर शिखर धवन (Shikhar Dhawan) भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. शिखर धवन पहिल्यांदाच कर्णधार पदाची जबाबदारी संभाळणार आहे. यामुळे हा दौरा शिखर धवनसाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे. या सामन्याआधी हवामान विभागाचा अंदाज आणि पिच रिपोर्ट जाणून घेणे अधिक महत्वाचे ठरणार आहे.

भारतीय संघ या दौर्‍यावर युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. घरगुती सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. अशा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. भारतीय संघ शेवटच्या मालिकेत विजय मिळवून मैदानात उतरणार आहे. तर, दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाने सलग तीन मालिका गमावल्या आहेत. आयसीसी क्रमवारीत भारतीय संघ चौथ्या तर, श्रीलंकेचा संघ नवव्या स्थानावर आहे. हे देखील वाचा- SL vs IND 1st ODI 2021: शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघातील 'हे' 11 खेळाडू श्रीलंकेशी भिडण्याची शक्यता, पाहा संपूर्ण यादी

हवामान विभागाचा अंदाज-

येथे नेहमी ह्यूमिडिटी पाहायला मिळते. तसेच पहिल्या सामन्यादरम्यान, 77 टक्के ह्युमिडिटी असण्याची शक्यता आहे. याचबरोबर हवा 24 किलोमीटर/ प्रति तास वाहण्याची शक्यता आहे. पाऊस पडण्याची शक्यता नसून कोणत्याही अडथळ्या शिवाय सामना सुरु होऊ शकतो.

पिच अहवाल-

प्रेमादासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअममधील पिच फलंदाजासाठी उत्तम आहे. तसेच सामन्याच्या सुरुवातील नव्या बॉलने स्विंग मिळतो. त्यानंतर पिच स्लो होते आणि फिरकीपटू गोलंदाजाला याचा फायदा मिळतो. या पिचवर 260 चांगला स्कोर मानला जातो.

भारताकडून आतापर्यंत 24 खेळाडूंनी कर्णधारपद भूषवले आहे. शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करणारा 25वा खेळाडू ठरेल. आजचा सामना दोन्ही संघाच्या कर्णधारासाठी महत्वाचा ठरणार आहे. यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो? हे सामन्याच्या अखिरेस कळणार आहे.



संबंधित बातम्या