IND vs NZ, World Cup 2019 Semi-Final: धोनी कुठे आहे? रोहित, विराट आणि राहुल बाद झाल्यावर चाहत्यांचा ट्विटरवर प्रश्न, पहा Tweets
सध्याची परिस्थिती पाहता मैदानात तग धरून राहणाऱ्या फलंदाजाची गरज आहे. यावेळी धोनीच भारताला विजय मिळवून देऊ शकतो.
आयसीसी क्रिकेट विश्वचषक सेमीफायनल जिंकण्यासाठी भारतीय संघाला (Indian Team) 240 धावांची गरज आहे. काल पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर आज राखीव दिवशी न्यूझीलंड (New Zealand) ने दिवसाची सुरुवात 46.1 ओव्हरमध्ये 211/5 एवढ्या स्कोअरवर केली. त्यानंतर फलंदाजीला मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची आघाडीची फळी अवघ्या 4 धावांत तंबूत परतली. आता मैदानात हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) खेळत आहेत. त्यांच्यासमोर आता विकेट टिकवण्याचं आव्हान असणार आहे. (IND vs NZ, World Cup 2019 Semi-Final मॅचआधी रवींद्र जडेजा याने उघडकीस केले टीम इंडिया चे मजेदार रहस्य, पहा Video)
भारतीय संघाची अशी बिकट परिस्थिती पाहून चाहत्यांनी मात्र ट्विटरवर धुमाकूळ घातला आहे. एकीकडे नेटिझन्स विराट (Virat Kohli), राहुल (KL Rahul) आणि कार्तिक (Dinesh Karthik) यांना ट्रोल करत आहे तर दुसरीकडे काही 'धोनी कुठे आहे? असं प्रश्न देखील विचारात आहे. यंदाच्या विश्वचषकमध्ये धोनीच्या संथ खेळीवर टीका केली असली तरी सध्या धोनी (MS Dhoni) सारख मैदानात टिकून राहण्याची गरज आहे. आणि सध्याची परिस्थिती पाहता मैदानात तग धरून राहणाऱ्या फलंदाजाची गरज आहे. यावेळी धोनीच भारताला विजय मिळवून देऊ शकतो.
धोनी फलंदाजीला न आल्यानं क्रिकेट तज्ज्ञ हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी धोनीला दुखापत झालीय का असा सवाल केला. त्याला तर मैदानात असायला हवं असंही त्यांनी विचारलं. क्रिकेट तज्ज्ञांनाही याची खात्री आहे की धोनी मैदानात आहे तोपर्यंत सामना भारताच्या बाजूने होऊ शकतो.
दरम्यान, भारताकडून भुवनेश्वर कुमारने ३ विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि युझवेंद्र चहलला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. रॉस टेलर शिवाय न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने अर्धशतक केलं. केन विलियमसन ६७ रन करून आऊट झाला.