IND vs NZ, World Cup 2019 Semi-Final मॅचमध्ये एम एस धोनी याने रचला इतिहास, बनला 350 वनडे सामने खेळणारा दुसरा भारतीय

न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनल मॅच ही धोनीच्या वनडे करिअरमधील 350 वा सामना आहे. याच बरोबर धोनी, सचिन तेंडुलकरनंतर 350 वनडे सामना खेळणारा दुसरा भारतीय झाला.

(Photo Credits: Twitter)

महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni), टीम इंडिया (Indian Team) चा स्टार विकेटकीपर-फलंदाजने आज आयसीसी (ICC) विश्वचषक सामन्यात न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सामन्यात एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केलाय. भारत-न्यूझीलंडमधील विश्वचषक सेमीफायनल सामना मॅन्चेस्टर (Manchester) येथील ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानावर खेळाला जाईल. आजच्या या महत्वाच्या सामन्यात एकीकडे चाहत्यांचे लक्ष सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) वर असणार आहे. दुसरीकडे, आजचा सामना भारताचा माजी कर्णधार धोनीसाठी देखील महत्वाचा असणार आहे. यंदाच्या विश्वचषकमध्ये धोनी साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याच्यावर सर्व बाजूने टीका होत आहे. (IND vs NZ, ICC World Cup 2019 Semi-Final: टॉस जिंकून न्यूझीलंडची फलंदाजी, कुलदीप यादवच्या जागी युझवेन्द्र चहल संघात)

न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनल मॅच ही धोनीच्या वनडे करिअरमधील 350 वा सामना आहे. याच बरोबर धोनी, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) नंतर 350 वनडे सामना खेळणारा भारत दुसरा झाला. शिवाय त्याने श्रीलंकेच्या माजी स्पिनर मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. मुरलीधरनने देखील 350 आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळले आहेत.

सर्वाधिक वनडे खेळलेला क्रिकेटपटू

सचिन तेंडुलकर-463

महेला जयवर्धने-448

सनथ जयसूर्या-445

कुमार संगकारा-404

शाहिद आफ्रिदी -398

इंजमाम उल हक-378

रिकी पॉन्टिंग-375

वसीम अक्रम -356

मुथय्या मुरलीधरन-350

एमएस धोनी- 350*

आतापर्यंत धोनीने टीम इंडियासाठी 349 वनडे आणि आशिया इलेव्हनसाठी 3 सामने खेळले आहेत. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यासाठी भारताने 11 जणांच्या संघात एक बदल केला आहे. भारताने या सामन्यात कुलदीप यादव (Kuldeep Yadav) ऐवजी युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ला आज संधी दिली आहे. तसेच न्यूझीलंडने टीम साऊथी ऐवजी लॉकी फर्ग्यूसन (Lockie Ferguson) ला संधी दिली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now