India vs England Live Cricket Streaming on DD Sports and Prasar Bharati Sports for Free: रेडिओ वर लुटा IND vs ENG मॅच चा LIVE आनंद
दरम्यान, देशाचा बहुचर्चित रेडिओ चॅनेल प्रसार भरती स्पोर्ट्स (Prasar Bharti Sports) भारत-वेस्ट इंडिज सामन्याची लाइव कमेंट्री करणार आहे.
इंग्लंड (England) मध्ये चालू असलेल्या आयसीसी (ICC) विश्वकप यामध्ये आपल्या सलग 5 विजयासह भारतीय संघाची विजयी घौडदौड सुरु आहे. भारतानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. आज एजबस्टन (Edgbaston) येथे भारत (India)-इंग्लंड विरोधात खेळणार आहे. आजचा सामना जिंकल्यास भारत सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो. भारत (India)-इंग्लंड मधील सामना बघण्यासाठी हजारो प्रेक्षक एजबस्टन ला पोहचले आहे. जे चाहते इंग्लंड ला जाऊन हा सामना बघण्यात असमर्थ आहे ते टीव्ही वर DD Sports वर या सामन्याचा आनंद लुटू शकतात. दरम्यान, देशाचा बहुचर्चित रेडिओ चॅनेल प्रसार भरती स्पोर्ट्स (Prasar Bharti Sports) भारत-वेस्ट इंडिज सामन्याची लाइव कमेंट्री करणार आहे. आपण प्रसार भारती च्या FM 106.40 मेगाहर्ट्ज वर जाऊन या सामन्याची कॉमेंटरी ऐकू शकतात. (ICC World Cup 2019: टीम इंडिया बांगलादेश, श्रीलंका विरुद्ध मुद्दाम हरणार, पाकिस्तानी बसीत अली याचा भारतावर मॅच फिक्सिंगचा आरोप)
हा भारताचा सातवा सामना आहे. टीम इंडिया ने पाच सामन्यात विजय मिळवला आहे तर न्यूझीलंड (New Zealand) विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दुरीकडे, इंग्लंडने 7 सामने खेळले आहेत. त्यात ४ सामन्यात विजय मिळवला आहे. तर, ३ सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. गुणतक्त्यात भारत सध्या ११ गुणांसह दुसऱ्या स्थाावर आहे तर यजमान इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे.
आजचा सामना इंग्लंडसाठी महत्वाचा आहे. आजचा सामना गमावलास इंग्लंड संघाची सेमीफायनल मध्ये पोचण्याची वाट बिकट होऊ शकते. याआधी इंग्लंड ला नामवंत ऑस्ट्रेलिया ने सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता. दुरीकडे, भारत आणि न्यूझीलंड चे सेमीफाइनलमधील स्थान पक्के आहे. चौथ्या स्थानासाठी इंग्लंडसह बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका, हे तीन संघ पप्रयत्नांत आहे.