ICC World Cup 2019: IND vs ENG सामन्यात विराट कोहली ला रेकॉर्ड खेळी करण्याची संधी, जाणून घ्या

आणि आता इंग्लंडविरुद्ध सामन्यात कोहलीला ऑस्ट्रेलिया चा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथच्या रेकॉर्ड ची बरोबरी करण्याची संधी आहे. शिवाय, कोहलीला इंग्लंडच्या धर्तीवर सर्वाधिक वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याची ही संधी आहे.

(Image Credit: AP/PTI Photo)

आयसीसी (ICC) विश्वकप मध्ये यंदा विराट कोहली (Virat Kohli) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अपराजित राहिला आहे. टीम ने 6 पैकी 5 सामने जिंकले आहे तर एक सामना पावसामुळे रद्द केले होता. सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भारताचा सामना आज इंग्लंड (England) शी होत आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. इंग्लंडला सेमीफाइनलच्या रेसमध्ये टिकून राहायचे असल्यास भारताचा पराभव करणे गरजेचे आहे. दुरीकडे, इंग्लंड चा पराभव केल्यास भारत सेमीफायनल मध्ये पोहचेल. या महत्वाच्या सामन्यात भारतीय कर्णधार कोहलीला रेकॉर्ड खेळी करण्याची संधी आहे. (IND vs ENG, CWC 2019: सर जडेजाची कमाल! जेसन रॉय चा सुपरडुपर कॅच घेत भारताला मिळवून दिले पहिले यश, Netizens कडून कौतुकाचा वर्षाव )

यंदाच्या विश्वकप मध्ये विराटने आधीच कितीतरी रेकॉर्ड मोडले आहे. आणि आता इंग्लंडविरुद्ध सामन्यात कोहलीला ऑस्ट्रेलिया (Australia) चा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) च्या रेकॉर्ड ची बरोबरी करण्याची संधी आहे. इंग्लंडविरुद्ध अर्ध-शतकी खेळी केल्यास कोहली स्मिथ बरोबर सर्वाधिक अधिक अर्धशतक करण्याच्या विक्रमाची बरोबरी करता येईल. कोहलीने यंदा 4 अर्ध-शतकी खेळी केल्या आहेत. दुरीकडे स्टिव्ह स्मिथ ने सतत 5 अर्धशतकी खेळी केल्या आहेत. सध्या, कोहलीसह भारताच्या मोहम्मद अझरुद्दीन ने विश्वकपमध्ये लागोपाठ 4 अर्धशतक ठोकले आहे.

शिवाय, कोहली इंग्लंडच्या धर्तीवर सर्वाधिक वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याची ही संधी आहे. इंग्लंडविरुद्ध 50 धावा करत, राहुल द्रविड ला मागे टाकत इंग्लंडच्या धर्तीवर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय बाण्याची कोहलीला संधी आहे. कोहलीने इंग्लंडमध्ये 1198 धावा केल्या आहेत तर द्रविड ने 1238 धावा केल्या आहेत. दुरीकडे, त्याला अजून 97 धावांची गरज आहे विश्वकपमध्ये 1000 धावा पूर्ण करण्यासाठी. भारतासाठी, विश्वकपमध्ये सचिन तेंडुलकर (2278 धावा) आणि सौरव गांगुली (1006) या खेळाडूंनी 1000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

दरम्यान, भारत-इंग्लंड सामन्याकडे पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन संघांचे लक्ष लागून राहिलं आहे. सध्या बांगलादेश आणि पाकिस्तानला सेमीफायनलला पोहचण्याच्या आशा आहेत. इंग्लंडचा पराभव झाला तर त्या दोन्ही संघांना सेमीफायनलचे मार्ग खुले होतील.