IND vs BAN 1st T20I: भारत-बांग्लादेश पहिला टी-20 सामना ठरला ऐतिहासिक, 1000 व्या टी-20 मॅचमध्ये दोन्ही आशियाई संघ आमने-सामने

भारत आणि बांगलादेश संघांमधील पहिला टी-20 सामना टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील 1000 वा सामना आहे. या सामन्यासह भारत आणि बांग्लादेश संघ इतिहासात अमर झाले आहेत.

भारत-बांग्लादेश (Photo Credit: Getty Images)

भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघात आज टी-20 मालिकेतील पहिला सामना आज संध्याकाळी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम (Arun Jaitley Stadium) वर खेळला जात आहे. आजचा हा सामाना दोन्ही संघासाठी ऐतिहासिक दृष्टीने महत्वाचा आहे. सामन्यात प्रवेश करताच भारत आणि बांग्लादेश संघ इतिहासाच्या पानांमध्ये अमर झाला. भारत आणि बांगलादेश संघांमधील तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू होणार आहे. दोन्ही संघांमधील खेळलेला सामना टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील 1000 वा सामना आहे. या सामन्यासह भारत आणि बांग्लादेश संघ इतिहासात अमर झाले आहेत. 2005 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पहिला आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट सामना आयोजित केला. पहिला टी -20 सामना 7 फेब्रुवारी 2005 रोजी ऑस्ट्रेलियामध्ये खेळला गेला होता. आजच्या या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. नियमित कर्णधार विराट कोहली याला यंदाच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आल्याने रोहितकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. (IND vs BAN 1st T20I: रोहित शर्मा याने टीम इंडियासाठी केली 'या' विक्रमाची नोंद, एम एस धोनी ही राहिला मागे)

दरम्यान, आजच्या मॅचमध्ये बांग्लादेशने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या मॅचमध्ये भारतीय संघात अष्टपैलू शिवम दुबे याने टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहेत. या मालिकेत विराट कोहली याला विश्रांती देण्यात आली आहे.

असा आहे भारत-बांग्लादेशचा प्लेयिंग इलेव्हन: 

भारतीय संघ: रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), क्रुणाल पंड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, दीपक चहर आणि खलील अहमद.

बांगलादेश संघ: सौम्या सरकार, लिंटन दास, मोहम्मद नईम, मुश्फिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला (कर्णधार), मोसद्देक हुसेन, आफिफ हुसेन, मोसद्देक हुसैन, अमीनुल इस्लाम, सैफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान आणि अल-अमीन-हुसेन.