India vs Bangladesh T20 Head To Head Record: बांगलादेश विरुद्धच्या टी 20 मध्ये टीम इंडियाचा असा आहे रेकॉर्ड; येथे पहा हेड टू हेड आकडेवारी

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील दुसरा सामना 9 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या टी 20 मध्ये भारतीय संघाने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला होता.

India vs Bangladesh T20 Head To Head Record: बांगलादेश विरुद्धच्या टी 20 मध्ये टीम इंडियाचा असा आहे रेकॉर्ड; येथे पहा हेड टू हेड आकडेवारी
Photo Credit- X

Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team T20 Head To Head: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील दुसरा सामना 9 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या टी 20 मध्ये भारतीय संघाने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा संघ 19.5 षटकांत सर्वबाद 127 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताने 11.5 षटकांत लक्ष्य गाठले. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता भारताच्या नजरा दुसऱ्या सामन्यात बांगलादेशला हरवून मालिका जिंकण्यावर असतील. दुसरीकडे पाहुणा संघ दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे दुसरा सामनाही रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा: IND vs BAN 2nd T20 2024 Live Telecast On DD Sports: भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा टी 20 सामना; कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या )

दोन्ही संघांमधील हेड टू हेड आकडेवारी

भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 15 वेळा टी-20 सामना झाला आहे. ज्यामध्ये टीम इंडियाने 13 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशला केवळ एकच विजय मिळाला आहे. दोन्ही संघांमधील शेवटच्या पाच सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाचा वरचष्मा दिसतो. भारताने पाचही सामन्यांमध्ये बांगलादेशचा पराभव केला आहे. तर बांगलादेशने एकही सामना जिंकलेला नाही.

दोन्ही संघांपैकी 11 खेळण्याची शक्यता

भारताचे प्लेइंग 11: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रायन पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव.

बांगलादेशचे प्लेइंग 11: लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), परवेझ होसेन आमोन, तौहीद हृदयॉय, महमुदुल्ला, झाकेर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तंजीम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.

(The above story first appeared on LatestLY on Oct 09, 2024 11:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).