IND vs BAN (Photo Credit: BCCI)

IND vs BAN 2nd T20 2024 Live Telecast On DD Sports: भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा टी 20 सामना 09 ऑक्टोबर (बुधवार) रोजी दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. बांगलादेश संघ भारतीय संघाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20I मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे बांगलादेशचा पुनरागमनाचा प्रयत्न असेल. कसोटी मालिकेतील नेत्रदीपक विजयानंतर, टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशला पराभूत केल्याने टी 20 मालिकेत सकारात्मक सुरुवात केली. दरम्यान, भारत विरुद्ध बांगलादेश 2रा टी20 2024 सामना विनामूल्य डिश टीव्ही चॅनेलवर थेट प्रसारित करण्यात. येणार आहे. हेही वाचा: भारत विरुद्ध बांगलादेश दुसऱ्या टी20 सामन्यात पावसाचा कहर होईल का? येथे जाणून घ्या, दिल्लीचे हवामान कसे असेल आणि अरुण जेटली स्टेडियमच्या खेळपट्टीची स्थिती.

भारत विरुद्ध बांगलादेश टी20 मालिकेचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल. त्याच वेळी, या मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग चाहत्यांसाठी JioCinema ॲपवर विनामूल्य उपलब्ध असेल. त्याचबरोबर फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर मॅच पास घेऊन चाहत्यांना मॅचचा आनंद लुटता येणार आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश 2रा टी 20 लाइव्ह टेलिकास्ट डिशवर उपलब्ध होईल का?

भारत विरुद्ध बांगलादेश टी20 मालिका 2024 सामन्याचे प्रसारण हक्क डी डी स्पोर्ट्स ला मिळाले आहेत. डी डी स्पोर्ट्स 1.0 वर भारतातील सामन्यांचे थेट प्रक्षेपण फक्त डी डी फ्री डिश आणि इतर डिजिटल टेरेस्ट्रियल टेलिव्हिजन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल.