India Vs Australia: जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी यांच्या यॉर्करचे आस्ट्रेलिया संघासमोर मोठे आव्हान; बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील क्रिकेट सामन्याला उद्यापासून सुरुवात होणार असून यापूर्वी सराव सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि नवदीप सैनी (Navdeep Saini) यांच्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष केंद्रीत करुन घेतले आहे.
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील क्रिकेट सामन्याला उद्यापासून सुरुवात होणार असून यापूर्वी सराव सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि नवदीप सैनी (Navdeep Saini) यांच्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष केंद्रीत करुन घेतले आहे. श्रीलंका विरूद्ध भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी बजावली होती. आता ऑस्ट्रेलिया विरूद्ध होणाऱ्या सामन्यातही भारतीय गोलंदाज महत्वपूर्ण कामगिरी करतील अशी अपेक्षा केली जात आहे. नुकताच बीसीसीआयने (BCCI) त्यांच्या अधिकृत खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच भारतीय गोलंदाजाच ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर मोठे आव्हान असणार असे स्पष्ट होत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका रंगणार आहे. याआधी भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळली गेली होती. दरम्यान, भारतीय संघाने उत्तम कामगिरी करत 2-0 अशी आघाडी घेत मालिका खिशात घातली होती. मुंबई येथील वानखेडे मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. तसेच उद्याच्या सामन्यात भारतीय गोलंदाज चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा केली जात आहे. यातच बीसीसीआयने जसप्रीत बुमराह आणि युवा खेळाडू नवदीप सैनी यांनी नेटमध्ये प्रॅक्टिस करत असताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही गोलंदाज अचूक यार्कर करुन सर्वांचे लक्ष केंद्रीत करत आहेत. हे देखील वाचा- IND vs AUS 1st ODI: विराट कोहली याने नेट्समध्ये जसप्रीत बुमराह याला सामोरे जाण्याचा शेअर केला मजेदार अनुभव, पाहा (Video)
बीसीसीआयचे ट्वीट-
भारताचा युवा गोलंदाज नवदीप सैनीने नुकतेच श्रीलंका संघाविरोधातील 2 सामन्यात 5 विकेट मिळवून मॅन ऑफ द सीरीजचा मान पटकावला होता. दुसरीकडे, दुखापतीनंतर जसप्रीस बुमराह देखील संघात परतले आहेत. श्रीलंका यांच्या विरोधात झालेल्या सामन्यात जसप्रीत बुमराह याने तब्बल एका वर्षानी टी-20 सामना खेळला होता. तसेच त्याने एकदिवसीय सामना न्यूझिलंड संघाविरोधात जुलै महिन्यात खेळला होता.