जेव्हा महेंद्रसिंग धोनीने मेलबर्नच्या मैदानावर पाऊल ठेवले आणि धोनी.. धोनी नावाचा चाहत्यांकडून प्रेम वर्षाव (Video)
धोनी अशा आवाजात त्याच्यावर प्रेम वर्षाव केला.
India VS Australia : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन-डे सामन्यातील अखेरच्या दिवशी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याच्या चाहत्यांनी मेलबर्न मैदानवर चक्क धोनी... धोनी अशा आवाजात त्याच्यावर प्रेम वर्षाव केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायर होत आहे. तसेच धोनीच्या कामगिरीबद्दल ही सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतीय संघापुढे 231 धावांचे आव्हान ठेवले होते. परंतु भारतीय संघाची सुरुवातीला खेळी धिम्या गतीने सुरु झाली. तर रोहित शर्माच्या विकेट नंतर मैदानावर धोनी खेळण्यास उतरला. धोनी येताच त्यावेळी चाहकत्यांकडून फक्त धोनी धोनी म्हणत संपूर्ण मैदान दणाणून सोडले.
या वन-डे क्रिकेट सामन्यामध्ये धोनीने अर्धशतक झळकावले. तसेच मालिकावीर म्हणून धोनीला सामन्याअंती गौरवण्यात आले. आता ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघ न्युझीलंड विरुद्धचा सामना खेळण्यासाठी रवाना होणार आहे.