ICC World Cup 2023 Final: सोनिया गांधी यांच्याकडून आयसीसी विश्वचषक अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाला शुभेच्छा (Watch Video)
या सामन्यापूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी ( Sonia Gandhi) यांनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत.
आयसीसी विश्वचषक 2023 अंतिम सामना (ICC World Cup 2023 Final) अहमदाबाद येधील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium in Ahmedabad) वर खेळला जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या हा सामना आज (19 नोव्हेंबर) पार पडतो आहे. या सामन्यापूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी ( Sonia Gandhi) यांनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. खेळाच्या एकात्मतेच्या ताकदीचे कौतुक करत त्यांनी लिंग, प्रदेश, भाषा, धर्म आणि वर्गाच्या अडथळ्यांना पार करून, क्रिकेटने राष्ट्राला सातत्याने कसे बांधून ठेवले याबाबत आपल्या शुभेच्छा संदेशात जोर दिला आहे.
सोनिया गांधी यांच्याकडून व्हिडिओद्वारे संदेश
अहमदाबाद येथे फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी तयार असलेल्या भारतीय संघाला सोनिया गांधींनी एका व्हिडिओ संदेशात व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांचे मनापासून कौतुकही केले. भारतीय क्रिकेट संघाने देशाला सातत्याने गौरव मिळवून दिल्याबद्दल आणि देशाच्या हृदयात सामूहिक आनंद आणि अभिमान जागवल्याबद्दल त्यांनी संघाचे कौतुक केले.
'भारत विश्वविजेता बनेल'
भारतीय क्रिकेट संघ अंतिम सामन्यासाठी तयारी करतो आहे. जी जवळपास पूर्ण झाली आहे. अशा वेळी सामन्याच्या आदल्या दिवशी सोनिया गांधी यांनी संघाला आपला पाठिंबा आणि शुभेच्छा असल्याचे म्हटले आहे. भारत विश्वविजेता बनेल यावरही त्यांनी भर दिला. तसेच, 1983 आणि 2011 मधील भारताच्या मागील विजयांचे स्मरण करून, गांधींनी त्या ऐतिहासिक क्षणांमध्ये देशाच्या सन्मान आणि आनंदाच्या भावनेवर जोर दिला. क्रिकेट-वेडे राष्ट्र फायनलच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत असताना, सोनिया गांधींचे शब्द टीम इंडियासाठी प्रोत्साहन आणि एकजुटीचे स्त्रोत असल्याची भावना सोशल मीडियावर अनेकांनी व्यक्त केली आहे.
विश्वचषक सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ
भारतीय संघ: रोहित शर्मा (क), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, प्रसिद्ध कृष्णा, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (क), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
व्हिडिओ
दरम्यान, ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 अंतिम सामन्यासाठी काउंटडाऊन सुरु झाले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोघे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यसाकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. प्रत्यक्ष स्टेडीयमवरच हा सामना पाहण्यासाठी 100,000 हून अधिक क्रिकेटप्रेमी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.