India Vs Australia 1st Test: चौथ्या दिवसाखेरीज भारतीय संघ मजबूत स्थितीत; विजयासाठी 6 विकेट्सची गरज

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाअखेरीस ऑस्ट्रेलियाची खेळ 4 बाद 104 असा आहे.

भारतीय क्रिकेट संघ ((Photo Credit: Twitter)

India Vs Australia 1st Test:  भारत  (India) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाअखेरीस ऑस्ट्रेलियाचा खेळ 4 बाद 104 असा आहे. भारताने ऑस्ट्रेलियापुढे 323 धावांचे आव्हान ठेवले होते. ही स्थिती पाहात भारताची सामना जिंकण्याची शक्यता अधिक आहे. कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी 6 विकेट्सची गरज असणार आहे. तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 219 धावांची गरज आहे. 

तिसऱ्या दिवसाखेरीस चेतेश्वर पुजारा 40 धावा करत नाबाद तर अजिंक्य राहाणे 1 धावा करत नाबाद राहिले होते. त्यामुळे चौथ्या दिवशी त्यांनी दमदार कामगिरी करत भारताची स्थिती मजबूत केली. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकांमुळे भारताला 300 धावांचा टप्पा गाठता आला. पुजाराने यावेळी 71 तर अजिंक्यने 70 धावा केल्या. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारताची 166 धावांची आघाडी

पाचव्या दिवशी देखील भारताने चांगले प्रदर्शन केल्यास भारताकडे ही कसोटी जिंकण्याची चांगली संधी आहे.