भारत अंडर-19 टीम ने कॉपी केला युजवेंद्र चहल-श्रेयस अय्यर यांचा व्हिक्टरी डान्स, पाहा Video

अंडर-19 टीमने युजवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यरचा व्हिक्टरी डान्स कॉपी करत याचा आनंद साजरा केला. त्यांचा हा व्हिडिओ भारत आर्मीच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यात संघाचा कर्णधार प्रियम गर्ग, उपकर्णधार ध्रुव जुरेल, फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई, शुभंग हेगडे आणि अथर्व अंकोलेकर यूझी-श्रेयसचाव्हिक्टरी डान्स करताना दिसत आहे.

टीम इंडिया आणि भारत अंडर-19 (Photo Credit: Instagram/thebharatarmy)

न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने (India) टी-20 क्रिकेटमध्ये क्लीन स्वीप करत किवी देशात पहिल्यांदा 5 सामन्यांची टी-20 मालिका जिंकणारा पहिला संघ बनला. या खास प्रसंगी टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) खास डान्स मूव्हस करताना दिसले. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये त्यांनी 'व्हिक्टरी डान्स' (Victory Dance) म्हणून लिहिले. दोघांचा डान्स व्हिडिओ लगेच व्हायरल झाला आणि सर्व याला कॉपी करीत आहेत आणि व्हिडिओ शेअर करत आहेत. यामध्ये आता भारत अंडर-19 टीमदेखील शामिल झाली आहे. अंडर-19 संघ सध्या दक्षिण आफ्रिकामध्ये विश्वचषक (World Cup) खेळत आहे. संघ फायनलमध्ये पोहचला आहे. भारत सलग तिसऱ्यांदा अंडर-19 विश्वचषकच्या फायनलमध्ये पोहचणार पहिला संघ बनला. भारताचे हे सातवे फायनल असणार आहे. आणि अंडर-19 टीमने व्हिक्टरी डान्स कॉपी करत याचा आनंद साजरा केला. (IND vs NZ: श्रेयस अय्यर-रॉस टेलर यांनी वनडेत मिळून नोंदवला अविश्वसनीय रेकॉर्ड, वनडे इतिहासात फक्त तिसऱ्यांदा घडले असे)

त्यांचा हा व्हिडिओ भारत आर्मीच्या (Bharat Army) अधिकृत इन्स्टाग्रामवर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यात संघाचा कर्णधार प्रियम गर्ग, उपकर्णधार ध्रुव जुरेल, फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई, शुभंग हेगडे आणि अथर्व अंकोलेकर यूझी-श्रेयसचाव्हिक्टरी डान्स करताना दिसत आहे. हे सर्वांनी चहल-अय्यरच्या डान्सची नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात त्यांना यश आले. पाहा हा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

🇮🇳 GROOVING FOR THE FINAL! The U19 #TeamIndia colts took up the #YuziCanDance before the final against #Bangladesh and the boys killed it 🔥. . #U19CWC #FutureStars #starsoftomorrow #teamindia #COTI #indiancricketteam #lovecricket #cricket #BharatArmy

A post shared by The Bharat Army (@thebharatarmy) on

या व्हिडिओवर चहलने प्रतिक्रिया दिली आणि अंडर-19 फायनलसाठी टीमला शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, गुरुवारी अंडर-19 विश्वचषकचा दुसरा सेमीफायनल सामना खेळण्यात आला ज्यात बांग्लादेशने न्यूझीलंडविरुद्ध 6 विकेटने विजय मिळवला. यापूर्वी, पहिल्या सेमीफाइनल सामन्यात भारताने पाकिस्तानचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला आणि सातव्यांदा फायनल गाठले. दुसरीकडे, न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात पराभवाला सामोरे गेल्यावर टीम इंडिया आता ऑकलंडच्या ईडन पार्कवर विजयाची हॅटट्रिक करण्याच्या प्रत्यत्नत असेल. न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाने या मैदानावर झालेले पहिले दोनही टी-20 सामने जिंकले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now