भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑगस्टमध्ये श्रीलंका (Sri Lanka) दौरा करण्यास सहमती दर्शविली असून ते दोन्ही सरकारच्या मंजुरीच्या अधीन आहेत'द आयलंड'ने म्हटले. न्यूझीलंड दौर्यावरुन परत आल्यापासून टीम इंडियाने (Team India) कोणत्याही प्रकारचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वनडे मालिकाही कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आली. आणि आता ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ (Indian Team) नियोजनानुसार श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. आणि याचा अर्थ क्रिकेट प्रेमींना लवकरच आपल्या आवडत्या खेळाडूंना मैदानावर परत पाहता येईल. विराट कोहलीची टीम इंडिया जून महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर 3 वनडे आणि तितकेच टी-20 सामने खेळणार होती, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दौरा पुढे ढकलण्यात आला. श्रीलंकेत अनेक कोरोना रुग्ण नसल्यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने यापूर्वी भारतीय मंडळाला द्विपक्षीय मालिकेसाठी संघ पाठवण्याची विनंती केली होती. (IND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत)
अहवालात म्हटले आहे की बीसीसीआयने मंगळवारी श्रीलंका दौऱ्यावर जाण्याची तयारीची पुष्टी केली. श्रीलंकेचे क्रिकेट बोर्ड आता देशातील द्विपक्षीय क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी देशाच्या क्रीडा मंत्रालयाची परवानगी घेईल आणि सरकारने मंजुरी दिल्यास एसएलसी मालिकेचे वेळापत्रक व इतर तपशीलांवर काम करेल. सामाजिक दूर अंतराची निकष सुनिश्चित करताना काही प्रेक्षकांना मालिका पाहण्यासाठी स्टँडमध्ये परवानगी देण्याची मंडळाची अपेक्षा आहे, असे या अहवालात नमूद केले आहे. “आम्हाला 30 ते 40 टक्के जागा भरण्याची इच्छा आहे. प्रेक्षक एक मीटर अंतर ठेवून खेळ पाहू शकतात. तथापि, अंतिम निर्णय आरोग्य अधिकारी करतील. आम्ही त्यांच्या सर्व सूचनांचे पालन करू,” द आयलँडने दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी म्हणाले.
दरम्यान, श्रीलंका यंदा आशिया चषकचे आयोजन करण्याचीही अपेक्षा आहे. स्पर्धा मुळात पाकिस्तानमध्ये होणार होती, पण भारतीय संघ तिथे खेळू शकणार नाही असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, आता पाकिस्तान बोर्ड तटस्थ ठिकाण शोधण्याच्या प्रक्रियेत आहे. श्रीलंका क्रिकेटचे (एसएलसी) प्रमुख शम्मी सिल्वा म्हणाले की, एसएलसी स्पर्धेचे आयोजन करीत असल्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्डला हरकत नाही.