India Tour of Bangladesh 2022: भारतीय क्रिकेट संघ तब्बल 7 वर्षानंतर बांगलादेश दौरा करणार, वाचा सविस्तर
परंतु, भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक व्यस्त आहे.
India Tour of Bangladesh 2022: कोरोनाने शिरकाव केल्यानंतर आयपीएलचा चौदावा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. परंतु, भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक व्यस्त आहे. भारतीय संघ जून महिन्यात आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडच्या संघाशी भिडणार आहे. तसेच भारतीय संघाची बी टीम जुलैमध्ये श्रीलंकेचा दौऱ्यावर जाणार आहे. याचदरम्यान, भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातच भारतीय संघ पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 बांगलादेशचा दौरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भारतीय संघ नोव्हेंबर 2022 मध्ये बांगलादेशमध्ये जाणार आहे. या दौऱ्यात भारत बांगलादेश विरुद्ध 2 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. महत्वाचे म्हणजे, तब्बल 7 वर्षानंतर भारतीय संघ बांगलादेशचा दौरा करणार आहे. याआधी भारताने 2014 आणि 2015 मध्ये बांगलादेश दौरा केला होता. भारत आणि बांगलादेश यांच्यात 2015 मध्ये एक कसोटी आणि 3 एकदिवसीय मालिका खेळण्यात आली होती. हे देखील वाचा- AB de Villiers निवृत्तीतून करणार आंतरराष्ट्रीय कमबॅक? CSA ने दिली बिग ब्रेकिंग
बांगलादेश संघाबाबत बोलायचे झाले तर, त्यांनी 2015 नंतर 2 वेळा भारत दौरा केला आहे. बांगलादेशने 2017 मध्ये भारतात एक कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर 2019 भारताविरुद्ध 2 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामने खेळले होते. यातील एक कसोटी सामना कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानात खेळण्यात आला होता. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत खेळली गेली होती. यावर्षी ऑस्ट्रेलियाचा संघ बांगलादेश दौरा करणार आहे. या मालिकेसदर्भात अद्याप तारीख जाहीर झाल्या नाहीत.