IND vs BAN 2nd Test Day 5: कानपूर कसोटीत भारताचा विजय पक्का! आता करावं लागणार फक्त 'हे' काम
यानंतर टीम इंडियाकडे 52 धावांची आघाडी होती. चौथ्या दिवशी बांगलादेश संघाने दुसऱ्या डावात 26 धावांत दोन विकेट गमावल्या होत्या.
India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूर (Kanpur) येथे सुरू (IND vs BA 2nd Test) असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचे दोन दिवस पावसामुळे वाया गेले. त्यानंतर चौथ्या दिवशी 98 षटकांचा खेळ होणार होता. आज पुन्हा एकदा 98 षटकांचा खेळ होणार आहे. पहिल्या डावात टीम इंडियाने आक्रमक फलंदाजी करत 285 धावा करून डाव घोषित केला. यानंतर टीम इंडियाकडे 52 धावांची आघाडी होती. चौथ्या दिवशी बांगलादेश संघाने दुसऱ्या डावात 26 धावांत दोन विकेट गमावल्या होत्या. सध्या टीम इंडियाकडे 26 धावांची आघाडी आहे. आता कानपूर कसोटीत टीम इंडियाचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. (हे देखील वाचा: IND vs BAN 2nd Test Day 5 Live Streaming: कानपूर कसोटी रोमांचक स्थितीत, आज सामन्याचा शेवटचा दिवस; 'इथं' पाहा लाइव्ह)
बांगलादेशला लंचपर्यंत करावे लागणार ऑलआऊट
एकीकडे बांगलादेशचा संघ हा सामना अनिर्णित ठेवण्याच्या इराद्याने पाचव्या दिवशी खेळत राहील, तर दुसरीकडे टीम इंडियाने चौथ्या दिवशीच सांगितले होते की, जिंकण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट आहे. भारतीय गोलंदाज अप्रतिम फॉर्ममध्ये दिसत आहेत. चौथ्या दिवशीच आर अश्विनने बांगलादेशला 26 धावांत दोन धक्के दिले. आज पाचव्या दिवशी अश्विनची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. टीम इंडिया बांगलादेशला लंचपूर्वी किंवा पाचव्या दिवशी 50 षटकांच्या आत ऑलआउट करू इच्छित आहे.
टीम इंडिया 250 धावांचे लक्ष्यही सोडणार नाही
बांगलादेशला ड्रॉ किंवा विजयाचा विचार करायचा असेल, तर आधी टीम इंडिया समोर त्यांना 250 ते 300 धावांचं लक्ष्य ठेवावं लागेल, पण हे काम बांगलादेशसाठी खूप अवघड आहे. टीम इंडियाने आतापर्यंत ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, ते पाहता भारताला दुसऱ्या डावात विजयासाठी सुमारे 200 किंवा 230 धावांचे लक्ष्य ठेवण्याचा विचार करेल असे दिसून येते. चौथ्या दिवशी भारतीय संघाने अवघ्या 34.4 षटकांत 285 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता भारताकडे 250 धावा करण्यासाठी 35 किंवा 40 षटकांचा अवधी राहिला तर टीम इंडिया लक्ष्य गाठू शकेल.