IPL Auction 2025 Live

IND vs PAK World Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्याला होणार धमाकेदार सुरुवात, अरिजीत सिंग, सुखविंदर आणि शंकर महादेवन करणार परफॉर्म

अरिजितसोबत शंकर महादेवन (Shankar Mahadevan) आणि सुखविंदर सिंगही (Sukhwinder Singh) परफॉर्म करणार आहेत.

Arjit, Sukhwinder And Shankar Mahadevan (Photo Credit - Twitter)

भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना शनिवारी अहमदाबादमधील नरेंद मोदी स्टेडियमवर (Narend Modi Stadium in Ahmedabad) होणार आहे. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. विश्वचषक 2023 च्या 12 व्या सामन्यापूर्वी सेलिब्रेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये भारतातील तीन मोठे कलाकार परफॉर्म करणार आहेत. बॉलिवूडचा दमदार आवाज अरिजित सिंग (Arijit Singh) या शोचा एक भाग असणार आहे. अरिजितसोबत शंकर महादेवन (Shankar Mahadevan) आणि सुखविंदर सिंगही (Sukhwinder Singh) परफॉर्म करणार आहेत. बीसीसीआयने सोशल मीडियाच्या माध्यमातून भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी परफॉर्म करणाऱ्या कलाकारांची माहिती दिली. (हे देखील वाचा: IND vs PAK World Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी अहमदाबादला छावणी, सात हजार पोलिस आणि चार हजार होमगार्ड तैनात)

दुपारी 12.30 वाजल्यापासून कलाकार करणार परफॉर्म

बीसीसीआयने एक्सवर अरिजित, शंकर महादेवन आणि सुखविंदर यांचा फोटो शेअर केला आहे. शनिवारी दुपारी 12.30 वाजल्यापासून हे कलाकार परफॉर्म करणार आहेत. सामनापूर्व कार्यक्रम नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला जाईल. भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी जगभरातून चाहते आले आहेत. या सामन्याची तिकिटे खूप आधी विकली गेली होती.

क्रिकेट चाहत्यांसाठी माहिती

प्रेक्षक सकाळी 10 वाजल्यापासून नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये प्रवेश करू शकतात.

सामनापूर्व कार्यक्रम 12:30 वाजता सुरू होईल.

प्रेक्षक स्टेडियममध्ये पर्स, मोबाईल फोन, कॅप आणि औषधे सोबत घेऊन जाऊ शकतात.

गुजरात क्रिकेट असोसिएशन आत वैद्यकीय आणि मोफत पाण्याची व्यवस्था करेल.

अहमदाबादमध्ये कडक सुरक्षा

अहमदाबादमधील या हायप्रोफाईल मॅचसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षेसाठी 11 हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. भारत-पाकिस्तानचे संघ अहमदाबादला पोहोचले असून त्यांनी सरावही सुरू केला आहे. तथापि, जर आपण एकदिवसीय क्रिकेटमधील विक्रमांबद्दल बोललो तर पाकिस्तानचा वरचष्मा राहिला आहे. 134 पैकी 73 सामने जिंकले आहेत, तर भारतीय संघाने 56 सामने जिंकले आहेत. भारतीय संघ विश्वचषकात आपली विजयी घोडदौड कशी कायम ठेवतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.