India in Australia 2020-21: केएल राहुल भारतासाठी आगामी 3 वर्ल्ड कपमध्ये विकेटकीपिंग करण्यास सज्ज, MS Dhoni याला रिप्लेस करण्यावर केले मोठे विधान
व्यवस्थापनाने त्यांना दिलेल्या नवीन भूमिकेचा राहुल आनंद घेत असल्याचे दिसते आहे आणि आगामी तीन विश्वचषकांमध्ये संघासाठी विकेटकीपिंग करण्यासाठी तो सज्ज आहे असे म्हटले.
भारताचा दुसरा वर्ल्ड कप विजेता कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून यंदा ऑगस्ट महिन्यात निवृत्ती जाहीर केली आणि क्रिकेटींग तज्ज्ञ केएल राहुल (KL Rahul) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांच्याकडे धोनीची जगभरण्यासाठी पाहत आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताचा (India Tour of Australia) यष्टिरक्षक फलंदाज आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा नवीन उपकर्णधार केएल राहुलने माजी कर्णधार एमएस धोनीचे (MS Dhoni) कौतुक केले व माजी विकेटकीपरची जागा कोणी घेऊ शकत नाही असे म्हटले. न्यूझीलंडविरुद्ध मर्यादित ओव्हरच्या मालिकेत राहुलने विकेटकीपरची भूमिका बजावली, पण मर्यादित ओव्हरमध्ये धोनीची जागा घेण्यासाठी तो संकोच करताना दिसला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यापूर्वी राहुल म्हणाला की, एमएस धोनीसारखा दुसरा विकेटकीपर नाही आणि त्याने वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या भूमिका बजावल्या आहेत. (IND vs AUS 2020-21: जसप्रीत बुमराहने रवींद्र जडेजाच्या गोलंदाजी शैलीची केली अचूक नक्कल, पृथ्वी शॉ देखील उतरला मैदानात, पहा Video)
“एमएस धोनीची जागा कोणीच भरु शकत नाही, त्याने यष्टिरक्षक फलंदाजाला भूमिका उत्तम प्रकारे कशी पार पाडता येईल याचा मार्ग दाखविला आहे, मला वाटते की मी वेगवेगळ्या विकेटवर किती लांबीने गोलंदाजी केली जाऊ शकते या संदर्भात मी फिरकी गोलंदाजांना अभिप्राय देईन. विकेट किपर्सची ही जबाबदारी आहे, आणि मी हे काम न्यूझीलंडमधील एका मालिकेत केले आहे, आशा आहे की, मीही पुढे असेच करू शकतो,” व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत राहुल म्हणाला. शिवाय, व्यवस्थापनाने त्यांना दिलेल्या नवीन भूमिकेचा राहुल आनंद घेत असल्याचे दिसते आहे आणि आगामी तीन विश्वचषकांमध्ये संघासाठी विकेटकीपिंग करण्यासाठी तो सज्ज आहे असे म्हटले.
विशेष म्हणजे कोरोना व्हायरसपूर्वी भारतीय संघ व्यवस्थापन 50 ओव्हर क्रिकेटमध्ये राहुलला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून तयार करीत होता. 2021 आणि 2023 मध्ये भारत अनुक्रमे टी-20 विश्वचषक आणि वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करणार आहे. “मला काहीही सांगितले गेले नाही, आम्ही एक संघ म्हणून यापूर्वी विचार करीत नाही, वर्ल्ड कप महत्त्वाचा आहे, प्रत्येक संघासाठी ही एक दीर्घ दृष्टी आहे पण मला वाटते की, आम्ही अजूनही एका वेळी एक खेळ घेत आहोत, आणि मी कीपर-फलंदाज म्हणून सातत्याने कामगिरी करत राहिल्यास अतिरिक्त फलंदाज किंवा गोलंदाजी खेळण्याची निवड आपल्याला देते. येत्या तीन विश्वचषकात मी कायम ठेवू शकलो तर मला माझ्या देशासाठी हे करायला आवडेल,” राहुलने म्हटले.