IND vs AFG T20 WC 2024 Super 8 Live Streaming: सुपर-8 मध्ये भारताची बांगलादेशशी टक्कर, सेमीफायनलच्या तिकीटावर रोहित सेनाची नजर
आतापर्यत भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही आहे. तर, दुसरीकडे बांगलादेशची सुपर 8 मध्ये सुरुवात खुप वाईट झाली आहे.
IND vs BAN T20 WC 2024 Super 8: टी-20 विश्वचषक सुपर 8 मध्ये (T20 World Cup 2024) भारतीय संघाने अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव (IND Beat AFG) करुन विजयी सलामी दिली आहे. यासोबत भारतीय संघाने उपांत्य फेरीसाठी पुढील वाट सोपी केली आहे. या विजयानंतर भारतीय संघ ग्रुप-1 मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. आता भारतीय संघाचा दुसरा सामना आज शनिवारी बांगलादेशसोबत (IND vs BAN) होणार आहे. आतापर्यत भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही आहे. तर, दुसरीकडे बांगलादेशची सुपर 8 मध्ये सुरुवात खुप वाईट झाली आहे. शुक्रवारी ऑस्टेलियाने पहिल्याच सामन्यात बांगलादेशचा डीएलस नियमाच्या अधारे 28 धावांनी पराभव केला आहे. दोन्ही संघांमध्ये आज जो विजयी होईल तो उपांत्य फेरीत खेळणार हे जवळपास निश्चितच आहे.
कधी अन् कुठे खेळवला जाणार सामना
भारत आणि अफगाणिस्तान यामधील सुपर-8 सामना सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड, अँटिग्वा येथे खेळवला जाणार आहे. चाहत्यांना हा सामना 22 जूनला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहे. (हे देखील वाचा: IND vs BAN, T20I Head to Head Record: शनिवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार रोमांचक सामना, टी-20 क्रिकेटमध्ये कोणाचा वरचष्मा? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड)
मोबाईलवर 'फ्री' लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहायला मिळणार?
भारतात, टी-20 विश्वचषक 2024 सुपर-8 मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जाणारा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे टीव्हीवर थेट प्रसारित केला जाईल. डिस्ने प्लस हॉटस्टारवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'फ्री' असेल. तथापि, केवळ मोबाइल वापरकर्ते विनामूल्य लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकतील.
हेड टू हेड आकडेवारी
टी-20 सामन्यात भारत आणि बांगलादेश आतापर्यत 13 वेळा आमनेसामने आले आहे. यामध्ये भारताने 12 वेळा विजय मिळवला आहे तर बांगलादेशने फक्त एकदाच विजयाची चव चाखली आहे. त्यामुळे, शनिवारी होणाऱ्या सामन्यात भारताचे वर्चस्व दिसत आहे. पण तरीही भारतीय संघाने बांगलादेशला हलक्यात घेणे सोपे ठरणार नाही. कारण, बांगलादेश अटीतटीच्या सामन्यात उलेटफेर करण्यात माहीर आहे, त्यामुळे भारतीय संघाला सावध राहावे लागेल.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग 11 एक नजर
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.
बांगलादेश : तनजीद हसन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शकीब अल हसन, तौहीद ह्रदोय, महमुदुल्ला, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनजीद हसन शाकिब, मुस्तफिजुर रहमान.