IND vs BAN, T20I Head to Head Record: शनिवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार रोमांचक सामना, टी-20 क्रिकेटमध्ये कोणाचा वरचष्मा? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड
आता भारतीय संघाचा दुसरा सामना शनिवारी बांगलादेशसोबत (IND vs BAN) होणार आहे. आतापर्यत भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही आहे. तर, दुसरीकडे बांगलादेशची सुपर 8 मध्ये सुरुवात खुप वाईट झाली आहे.
IND vs BAN T20 WC 2024 Super 8: टी-20 विश्वचषक सुपर 8 मध्ये (T20 World Cup 2024) भारतीय संघाने अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव (IND Beat AFG) करुन विजयी सलामी दिली आहे. यासोबत भारतीय संघाने उपांत्य फेरीसाठी पुढील वाट सोपी केली आहे. या विजयानंतर भारतीय संघ ग्रुप-1 मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. आता भारतीय संघाचा दुसरा सामना शनिवारी बांगलादेशसोबत (IND vs BAN) होणार आहे. आतापर्यत भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही आहे. तर, दुसरीकडे बांगलादेशची सुपर 8 मध्ये सुरुवात खुप वाईट झाली आहे. शुक्रवारी ऑस्टेलियाने पहिल्याच सामन्यात बांगलादेशचा डीएलस नियमाच्या अधारे 28 धावांनी पराभव केला आहे. (हे देखील वाचा: Team India Stats In ICC T20 World Cup: भारताला टी-20 वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, हा अनोखा विक्रम मोडण्यापासून फक्त एक पाऊल दूर)
हेड टू हेड आकडेवारी
टी-20 सामन्यात भारत आणि बांगलादेश आतापर्यत 13 वेळा आमनेसामने आले आहे. यामध्ये भारताने 12 वेळा विजय मिळवला आहे तर बांगलादेशने फक्त एकदाच विजयाची चव चाखली आहे. त्यामुळे, शनिवारी होणाऱ्या सामन्यात भारताचे वर्चस्व दिसत आहे. पण तरीही भारतीय संघाने बांगलादेशला हलक्यात घेणे सोपे ठरणार नाही. कारण, बांगलादेश अटीतटीच्या सामन्यात उलेटफेर करण्यात माहीर आहे, त्यामुळे भारतीय संघाला सावध राहावे लागेल.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग 11 एक नजर
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.
बांगलादेश : तनजीद हसन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शकीब अल हसन, तौहीद ह्रदोय, महमुदुल्ला, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनजीद हसन शाकिब, मुस्तफिजुर रहमान.
(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2024 07:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

