IND W vs AUS W, 2nd T20I Live Streaming Online: आज भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पाहुण्यांसमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवले होते. बेथ मुनीच्या 89 धावांच्या जोरावर कांगारू संघाने 9 विकेट्सने सामना जिंकला.

Indian Women's Cricket Team | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

IND vs AUS T20 2022: भारत आणि ऑस्ट्रेलियाचे (IND vs AUS) महिला क्रिकेट संघ रविवारी (11 डिसेंबर) दुसऱ्या टी-20 सामन्यात भिडणार आहेत. पाच टी-20 मालिकेतील दुसरा सामना मुंबईतील डी.वाय पाटील स्टेडियमवर (D Y Patil Sports Stadium) होणार आहे. या मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताला दणदणीत पराभव दिला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पाहुण्यांसमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवले होते. बेथ मुनीच्या 89 धावांच्या जोरावर कांगारू संघाने 9 विकेट्सने सामना जिंकला. दुसरा सामना सायंकाळी 7 वाजल्यापासून खेळवला जाईल. (हे देखील वाचा: IND Beat BAN: भारताने तिसरा एकदिवसीय सामना जिंकला, बांगलादेशचा 227 धावांनी केला पराभव)

भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना कधी आणि कुठे खेळवला जाईल?

या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (11 डिसेंबर) होणार आहे. तसेच हा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

मालिकेतील दुसरा सामना किती वाजता खेळला जाईल?

मालिकेतील दुसरा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.00 वाजता खेळवला जाईल.

मालिकेतील दुसऱ्या सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पाहणार?

मालिकेतील दुसऱ्या सामन्याचे तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण पाहू शकता.

मालिकेतील दुसऱ्या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहणार?

तुम्ही Disney+ Hotstar वर भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह ठाकूर, मेघना सिंह, अंजलि शर्वाणी, देविका वैद्य, एस मेघना, ऋचा घोष (विकेटकीपर), हरलीन देओल.