IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत विराट कोहली याला धोनीसह अनेक दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड मोडण्याची संधी, वाचा सविस्तर

वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट मालिकेदरम्यान विराट एमएस धोनीचा सर्वात मोठा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे.

विराट कोहली आणि एमएस धोनी

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्याला 3 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. यादरम्यान पहिल्या दोन टी-20 सामन्यासाठी भारतीय संघ (Indian Team) अमेरिकेत दाखल झाला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडे कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विश्वचषकनंतर विंडीज आणि भारतीय संघाची ही पहिली द्विपक्षीय मालीका आहे. दोन्ही संघाकडे टी-20 क्रिकेटमध्ये प्रभावी खेळी करणारे आंतरराष्टीय दर्जाचे खेळाडू आहे. यंदाच्या दौऱ्यासाठी भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. (IND vs WI: वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान रोहित शर्मा, विराट कोहली यांना हे 3 रेकॉर्ड मोडण्याची संधी)

विंडीज विरुद्ध सर्व चाहत्यांचे लक्ष लागून असणार आहे ते कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्याकडे. भारतीय संघातील या दोन्ही मुख्य खेळाडूंनी विश्वचषकमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. रोहितने जिथे 6 शतकं ठोकली होती तर विराटने देखील प्रत्येक सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या मालिकेत दोन्ही खेळाडूंकडून मोठी खेळी करण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, टेस्ट सामन्यात विराट कोहली एमएस धोनीचा (MS Dhoni) सर्वात मोठा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. या दोन टेस्ट सामन्यात विराट धोनीला मागे टाकू शकतो. धोनी आतापर्यंतचा भारताचा यशस्वी कसोटी कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 60 सामन्यांपैकी 27 टेस्ट सामन्यात विजय मिळवला आहे, 18 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे तर 15 सामने अनिर्णीत राहिले आहेत. दुरीकडे, विराटच्या नेतृत्वाखाली 46 सामन्यांपैकी 26 कसोटी सामन्यात विजय तर 10 सामन्यात पराभव आणि 10 सामने अनिर्णित अनिर्णित राहिले आहेत. त्यामुळे भारतीय संघाने हे दोन सामने जिंकल्यास विराट टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार होऊ शकतो.

वेस्ट इंडिज विरुद्ध 2000 वनडे धावा

विराट कोहली (Image Credit: AP/PTI Photo)

886 गुणांसह कोहली वनडे क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. विश्वचषकमध्ये देखील विराट चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्यामुळे यंदाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. विंडीज विरुद्ध 33 वनडे सामन्यात त्याने 70.81 च्या उत्कृष्ट सरासरीने 1912 धावा केल्या आहेत. यात 7 शतकं आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 2000 वनडे धावांचा टप्पा गाठण्यासाठी कोहलीला अवघ्या 88 धावांची गरज आहे. कोहलीने विंडीजविरुद्ध 88 धावा केल्या तर तो कॅरिबियन देशाविरुद्ध हा आकडा पार करणारा पहिला भारतीय फलंदाज होईल.

दिलीप वेंगसरकर यांचा टेस्ट क्रिकेटमधील 6000 धावा

विराट कोहली (Photo Credits: Twitter)

माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांचा 6000 टेस्ट धावांचा रेकॉर्ड देखील धोक्यात आहे. यंदा विंडीजविरुद्ध टेस्ट मालिकेत कोहलीला 255 धावा करायच्या आहे वेंगसरकर यांना मागे टाकण्यासाठी. वेंगसरकर यांनी टेस्ट करिअरमध्ये 6868 धावा केल्या आहेत तर कोहलीने आजवर 6613 धावा केल्या आहे. त्यामुळे आगामी विंडीज टेस्ट मालिका विराटसाठी महत्वाची असणार आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट मध्ये 1000 धावा

Virat Kohli (Photo Credits: Getty Images)

सध्याच्या टेस्ट क्रमवारीत विराट अव्वल स्थानी आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 15 डावात 45.7373 च्या सरासरीने 686 धावा केल्या आहेत. यात दोन शतके (दुहेरी शतकासह) आणि तीन अर्धशतकं शामिल आहे. कोहली वेस्ट इंडिजविरुद्ध 1000 कसोटी धावा पूर्ण करण्यापासून 314 धावा दूर आहे. विंडीज विरुद्ध आगामी २ टेस्ट मालिकेत विराटने 314 धावा केल्यास तो कॅरेबियन संघाविरुद्ध 1000 धावा करणारा 11 वा भारतीय फलंदाज होईल.